Ads 468x60px

Thursday, September 13, 2012

मातृदेवो भव


      आज माझ्या खुपश्या मित्राना आई म्हणण्याची लाज वाटते, पण मी आज शपतेवर सांगतो की मी आई या शब्दाला इतके glamour प्राप्त करुन देईन की अमराठीच काय परदेशी लोक सुद्धा आईला (मम्मी, मौम ऐवजी) आईच म्हणतील.
**************************************************************************
    माझी आई अशिक्षित आहे यावर माझा अजिबात विश्वास बसत नाही.फ़क्त तिला लिहिता वाचता येत नाही म्हणून तिला अडाणी म्हणने मला अजिबात पटत नाही. अतिशोयक्ति नाही पण खरेच सांगतो मी माझ्या आईमध्ये क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांनाच पाहतो, आणि कुठेही त्यांचा फोटो पहिला की ही माझी आईच आहे असे वाटते.
****************************************************************************
     जन्मदिल्याबद्दल आईचे कसले आलेत उपकार? ते तर तिचे कर्त्तव्यच होते आणि म्हणून आईवर कसले आले प्रेम.जन्म देणे हे माझ्या दृष्टीने तरी काही अलौकिक काम नव्हे!
..    
पण ज्या परिस्थितीत तिने मला लहानाचे मोठे केले,जे संस्कार केले त्यामुले ती मला देवाहुनही प्रिय आहे!!
**************************************************************************



0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!