Ads 468x60px

Saturday, September 8, 2012

जीवन संघर्ष (प्रेरणादायी)

          होय, खचलोय मी सततच्या अपयशाने, व्यवस्थित नसलेल्या समाजव्यवस्थेने, दबलोय मी स्वतःच्या आणि अन्‌ आप्तेष्ठांच्या अपेक्षांनी. व्यथित आहे मी स्वकियांकडून स्वजनांवर होणाऱ्या अन्यायाने. आणि चितींत आहे सार्वजनिक बदलांसाठी आयुष्य वेचलेल्या महापुरुषांच्या बदनामीने.
           राखरांगोळी झाली आहे स्वप्नांची ती उमलण्यापुर्वी, अन भावभावनांचा चुराडा झालाय त्या व्यक्त करण्यापुर्वी काय करु? कुठे जाऊ? प्रश्न पडलाय मला. हे निर्मिका तुझ्या या सुंदर, अलौकिक कलाकृति असलेल्या या मनुष्य देहास आतून किड लागलेली आहे.अन्‌ हा कोणाचा पराभव आहे? हा साडेतीन हाताचा देह तुझ्यापासून दुरावला आहे आणि तू ही त्याला वार्‍यावर सोडून निर्धास्त झोपला आहे.
            पण हे निर्मिका तू काळजी करु नकोस,तू निर्धास्त झोप. आम्ही तुला उठवणार नाही आणि तुझ्याकडे दयेची याचनाही करणार नाही.पराभवाचा विचार आमच्या मनालाही शिवणार नाही. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही विजयीच असू आणि तुझ्या या मृत्युच्या अस्राला आम्ही अजिबात भिणार नाही उलट सह्स्रावदी जण या मृत्युस जिंकून अजरामर झाले आहेत. मग मी का पराभूत होऊ या फुटकळ अडचणीनीं.मी खचलो नाही आणि दबलोही नाही फक्त दोन पाऊले मागे आलो आहे, पुर्वीपेक्षा जास्त त्वेषाने लढण्यासाठी !!!!

                         ---संतोष गांजुरे

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!