Ads 468x60px

Saturday, September 8, 2012

सत्यमेव जयते (तात्विक)


         मी कधीही खोटे बोलत नाही यामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थच लपलेला आहे कारण खोटॆ बोलण्यासाठी लागणारी बौध्दिक क्षमता माझ्याकडॆ नसल्याकारणाने मला भराभर कल्पनेचे इमले चढवता येत नाहीत दुसरे असे की,मी खुपच आळशी असल्याने आपण काय बोललो हे लक्षात ठेवण्याचे कष्ट घेत नाही व सत्य एकाच वाक्यात संपत असल्याने त्यास पुराव्याच्या पुरवण्या जोडण्याची गरज पडत नाही.

              ---संतोष गांजुरे


0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!