दारुडा बाप
डोक्याला ताप,
नित्य बाचाबाच
आईला जाच.
मुर्दाड सरकार
आश्वासनांचा मार,
दारुडयांची धूळवड
लेकराबाळांची परवड.
भ्रष्ट पोलिस
पैशांची रास,
बार हातभट्टी
कारवाईस सुट्टी.
आज होईल
कोणीतरी करेल,
वर्षानुवर्षाचा रहाटगाडा
गाफीलपणा महागडा.
दारूबंदी मनसे
कारवाई तनसे,
जीवन स्वर्ग
सुखाचा 'राजमार्ग'.
----संतोष गांजुरे
डोक्याला ताप,
नित्य बाचाबाच
आईला जाच.
मुर्दाड सरकार
आश्वासनांचा मार,
दारुडयांची धूळवड
लेकराबाळांची परवड.
भ्रष्ट पोलिस
पैशांची रास,
बार हातभट्टी
कारवाईस सुट्टी.
कोणीतरी करेल,
वर्षानुवर्षाचा रहाटगाडा
गाफीलपणा महागडा.
दारूबंदी मनसे
कारवाई तनसे,
जीवन स्वर्ग
सुखाचा 'राजमार्ग'.
----संतोष गांजुरे
0 प्रतिक्रिया:
Post a Comment