मला खूपच भूक लागलीये, काहीतरी तजवीज करायलाच हवी.
भुकेने व्याकूळ असलो तरी काहीच सोय नाही अशातला भाग नाही .
पण खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशीचा हेका अजून कायम आहे .
या नसत्या दळभद्री शाही थाटासाठी, खूप मेहनतीची जोड हवी आहे.
पण असेल हरी तर देईल खाटल्यावरीची मग्रुरी अजून शाबूत आहे .
पराक्रमाला आळसाचे कोंदण आहे, रोज मनी दिवास्वप्न पाहणे आहे.
काही विशेष नाही मित्रांनो पण ...
भूकमोड तर होणार नाही ना? या चिंतेने आता झोपमोड झालीये!!!
****************************************************************

फार वर्षापूर्वी एका मराठी मालिकेच्या एका भागात लाईटर दहा वेळा पेटवण्याची पैज लागलेली असते, ज्याचा लाईटर असतो त्याला पूर्ण खात्री असते की तो लाईटर दहाच काय शंभर वेळा पेटवू शकेन, पण पैज खूप मोठी असल्याने खात्री पटविण्यासाठी आधीच तो लाईटर अनेक वेळा पेटवतो ... आणि ऐन पैईजेच्यावेळी दहाव्यांदा तो पेटतच नाही!!!!!!!!!!!!आता मला अगदी तशीच भिती वाटू लागली आहे !!!!!!!!!
---संतोष गांजुरे
0 प्रतिक्रिया:
Post a Comment