Ads 468x60px

Thursday, September 13, 2012

राजकीय आखाडा

  पवारसाहेबांना मानायला हवेच, भले त्यांनी गोर-गरिबांच्या तोंडाला गर्भश्रीमंत ,साखरसम्राट,शिक्षणसम्राट,उद्योगपति यांनी चाखलेल्या विकासाची उष्टी पाने पुसली असतील पण त्याच गर्भश्रीमंताना एकत्र करून राष्ट्रवादीकांग्रेस नावाचा जो राजकीय कारखाना काढला आहे त्यापैकी कोणत्याही भिकारडया गर्भ-श्रीमंताला अद्याप आत्महत्या करावी लागलेली नाही. पण हे नेहमी असेच असेल असे बिल्कूल नाही!!!
********************************************************************
कोँग्रेस, राष्ट्रवादी कोँग्रेस,भाजप, शिवसेना,मनसे आणि १७६० चिल्लर पक्षानो आपणास दारुबंदी करण्यास किती बळी हवे आहेत?
********************************************************************
     जनतेसमोर दर पाच वर्षांनी निर्लज्जपणे मतांची भिक मागणार्या पांढर्या गेंड्याना कधी लाज वाटली नव्हती व कधी वाटणारही नाही.जाऊ द्या नाही वाटली तर नको वाटू दे! ते आपल्या हातात नाही पण य़ेथून पुढे निदान त्यांना भिती तरी वाटायला हवी. 
********************************************************************           सामान्य जनतेचा राजकाराण्यावर बिलकुल विश्वास नाहिये.पण त्यांचा जनतेवर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणुनच ते इतके निर्दास्त आहेत त्यांना कसली भीती? कोण ठोकणारे असेल तर भीती वाटणार ना!जनता मुर्दाडासारखी सर्व सहन करून निद्रिस्त निपचित पडली आहे आता हे उठणारच नाही तर ठोकणार कसे?आणि म्हणुनच मी म्हणतो उठा आणि कामाला लागा..
********************************************************************
       जातीपातीचे धर्माचे राजकारण करून नेहमीच जातीयवादी धर्मांध शक्तींना दूर ठेवाणारया कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचे मनापासून अभिनंदन!!!!!
 ********************************************************************
आज प्रत्येक जण सम्राट झाला आहे कोणी कार्यसम्राट माजी आमदार तर कोणी युवासम्राट,ह्रदयसम्राट पण कार्यकर्तेच व्ह्याला कोणी तयार नाही.
********************************************************************
हिंदुस्थानची फाळणी झाली त्याबद्दल लोक महात्मा गांधीना कितीही वाईट म्हनू देत पण मी मात्र त्यांचा खुप आभारी आहे नाही तर आज हिंदुस्थानचा पाकिस्तान नक्कीच झाला असता आणि आज जी काही थोडीफार शांतता आहे ती सुद्धा आपल्या वाटयाला नसती आली..

                                                                                           (संतोबा)संतोष गांजुरे.

1 प्रतिक्रिया:

संतोष गांजुरे said...

me comment kelyaananatar
2 divasanantarchi pratikriya

http://www.saamana.com/2010/December/07/Index.htm

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!