आजारापेक्षा उपचार भयंकर...!!! याचा प्रत्यय आजची युवा पिढी घेत आहे..मध्यंतरी भारतात घटस्फोटाचे प्रमाण भयंकर वाढले होते की सर्वांनी लग्नसंस्था मोडकळीस आल्याची बोंब मारायला सुरूवात केली होती, पण आज जणू काही जादूची कांडी फिरल्याप्रमाणे उपवर मुला-मुलींना लग्नासाठी सुयोग्य जीवनसाथी मिळणे एवढे दूरापास्त झाले आहे की त्यांना आपले लग्न होईल की नाही याची शाश्वती राहिलेली नाही, मग अशा परिस्थितीत महत्प्रयासाने लग्न झाल्यावर आजच्या युवापिढीच्या मनात घटस्फोटाचा विचार तरी येईल का?
Thursday, September 13, 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 प्रतिक्रिया:
Post a Comment