Ads 468x60px

Wednesday, September 19, 2012

राजाची कर्जमाफी


                  सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी का देते हेच कळत नाही?

बरं दिली तर दिली ती पोहचली का त्यांच्यापर्यंत का मध्येच पाय फुटले तिला. जाऊ द्या हो आपले कार्यकर्ते तर गब्बर झाले ना! शेतकऱ्यांच्या आत्महत्तेशी आपले काय घेणे देणे!

   खरतर कर्जमाफिची काही एक गरज नाहिये,आपला शेतकरी कष्टाळू आहे भिकारी नव्हे!

त्यांना फ़क्त योग्य वीज,पाणी, बाजारपेठ द्या, कर्जमाफीच्या कुबडयांची त्यांना काही एक गरज नाहिये !!!




संतोष गांजुरे--                

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!