Ads 468x60px

Sunday, September 16, 2012

मी आणि माझी अहंकारीक वचने -- 2

   सुंदर गोष्टी नेहमीच कोणाच्या ना कोणाच्या मालकीच्या असायला ह्व्यात कारण त्या सार्वजनिक झाल्यानंतर त्यांचे सौंदर्य आणि पावित्र्य नष्ट झाल्याशिवाय रहात नाही..
******************************************
या जगात सुंदर मुलींपेक्षा काहीही सुंदर नाहीये...
******************************************
लग्न ही सर्वसामान्य गोष्ट नसती तर मी ती केव्हाच केली असती!!!!!!!!!!!!!!
******************************************
कितीही मुलीं बदलल्या तरी तक्रारी मात्र कधीच बदलत नाहित.
******************************************
आयुष्यात खूप दु:ख भोगलय. आता कुठे सुखाचे दिवस सुरू झालेत पण ...सध्या सर्व सुखच सुख आहे काहीच दु:ख नाही याचे मात्र प्रचंड दु:ख वाटतेय.
******************************************
प्रेम म्हणजे फक्त काही मिळवणे नव्हे तर खरे प्रेम म्हणजे त्याग,आणि हे खूपच कमी लोकांना कळते त्या कमी लोकांपैकी मी एक आहे. पण दुर्दैवाने हें मला खूप लवकर कळले एवढेच .. अगदी काही मिळवण्यापूर्वीच.!!!!!!
******************************************
 उपाशीपोटी अन्नाची किंमत तर भरल्यापोटी त्याची चव कळते!!!!!!!!!
******************************************
आळशीपणापेक्षा आळशीपणा घालवण्याचा आळशीपणा हा जास्त वाईट आहे
******************************************
अतिसुदंर असणार्या मुलींच्या पुर्वायुष्याची खरी कुडंली मिळवणे इतकेही अवघड नाही....
फ़क्त्त तिच्या ओळखीच्या एखाद्याला तिच्याशी लग्न करशील का म्हणून विचारा..
******************************************
 मुली खुप चोखंदळ असतात, प्रत्येक गोष्ठ त्या व्यवस्थित पारखूनच घेतात. अगदी दहा रुपयांचा नारळ घेताना देखिल तो त्या चारवेळा हलवूनच घेतात मात्र त्याच मुली आयुष्याचा जोडीदार निवडताना इतक्या गाफ़िल कशा काय राहतात तेच कळत नाही.
 ******************************************
 अनेकदा आवश्यक त्या गोष्ठींची उपलब्धता नसल्याने दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखा प्रकार घडतो.मात्र अशाने आहे ती गरज न भागता तिची पुर्वीपेक्षा जास्त तीव्रतेने जाणीव होते.
******************************************
 
0 प्रतिक्रिया:

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!