Ads 468x60px

Showing posts with label अहं वचने. Show all posts
Showing posts with label अहं वचने. Show all posts

Saturday, June 8, 2019

मी आणि माझी अहंकारीक वचने - १६

वर्तमानात मार्गक्रमण करत असताना, आपण भूतकाळात डोकावत असू तर भविष्यात आपण निश्चित अडखळणारच. जे होते, जे झालंय, त्यापेक्षा जे चाललं आहे आणि जे होणार आहे ते महत्वाचे.

##########################################
स्वकर्तुत्वाने यशस्वी होताना, बदनामीची भीती बाळगून चालत नाही. जे आपल्याशी बरोबरी करू शकत नाहीत, ते निश्चितपणे आपली बदनामी करतात.

##########################################
कधी कधी पात्रता नसणे ही एखाद्या पदाची पात्रता असू शकते. यामध्ये पात्र व्यक्तींवर अन्याय वगैरे नसून उच्चपदस्थाने आपल्या पदाला धोका होऊ नये म्हणून घेतलेली ती काळजी असते.

##########################################
अनायासे मिळालेल्या गोष्टींच्याप्रतीची (आई-वडील,देश,धर्म,वंश,भाषा,प्रांत इ.) जबाबदारी, आपण त्या गोष्टींचे उदात्तीकरण करून साळसूदपणे झटकत असतो.

##########################################
कितीही चांगली असो वा वाईट असो, कोणत्याही एकाच गोष्टीशी (विचारसरणी, व्यक्ती, आदर्श,पक्ष इ.) आपल्या निष्ठा बांधील नसाव्यात. अन्यथा ही एकनिष्ठता कट्टरवादाकडे झुकते आणि कोणताही कट्टरता वाद हा वाईटच असतो.
                                             
                                                                                                               संतोबा...
#################
उन्माद करून वास्तव बदलत नाही, 
फारतर उन्मादाची क्षणिक झिंग चढून 
आपल्याला आपल्या स्वतःच्या योग्यतेचा विसर पडेल. 
पण आपण केलेल्या उन्मादाची फळे आपल्यासह 
आपल्या संबंधितांना वर्षानुवर्षे भोगावी लागतील.                                                             
                                                             संतोबा...

टिप - योग्यता हा सौम्य शब्द वापरला आहे. त्याऐवजी लायकी,औकाद,कुवत यांपैकी कोणताही वापरू शकता.

मी आणि माझी अहंकारीक वचने - १५

राजकारणाला समाजकारणाची बाधा झाल्यापासून राजकारणाची वाताहत झाली आहे!

########################################
उन्माद आणि कट्टरता ही अशी दुधारी तलवार आहे जी विरोधकांसोबतच 
समर्थकांनादेखील घायाळ करते...

########################################
निवडणुका हा भारतीय लोकशाहीचा सर्वात पवित्र सण आहे. मतदानाचा हक्क बजावून त्यात मोठ्या उत्साहाने सामील होऊ. सर्वांगिण सार्वभौमत्व टिकवण्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे.  द्वेषाचे आणि फुक्या अस्मितेचे राजकारण करणाऱ्यांना नाकारून सामाजिक भान असलेल्या, सर्वसमावेशक राजकारण करणाऱ्यांना निवडून देऊया. तसेच वांझोटया अस्मितावाली दूतोंडी गांडूळ परत आढळ'णार नाहीत याची काळजी घेऊ .

########################################
फक्त प्रतीके बदलणे म्हणजे बदल नव्हे ही तर केवळ तडजोड.

########################################
लेकराने भोकाड पसरले की बालहट्ट पुरवावाच लागतो. पण बेरकी बाप त्यातूनही त्याला धडा शिकवतोच.

                                                                                                                                                  संतोबा...

मी आणि माझी अहंकारीक वचने - १४

तुम्ही सगळे चांगलेच आहात, पण फक्त तुम्हीच चांगले आहात हा गैरसमज तेवढा दूर करा!

########################################
तायडे खरंय, 
येवढ्याशा आघाताने तू उन्मळून पडली असतीस, मात्र माझ्यासाठी ही क्षुल्लक गोष्ट आहे. 
तुला जेवढा आनंद झालाय, तेवढं दुःख मला झालेलं नाहीये. आणि तुझा हा असला आनंद, मला पाहवतही नाही. 
त्यामुळे यापुढे तू नेहमी जळतच राहशील, याची काळजी मी घेईन!!!

########################################
सहानुभूती आणि कौतुकाच्या प्र'गतीरोधकावर कधीही अडखळू नये. तसेही अपयशी ठरल्यावर सहानुभूती आणि मेल्यावर कौतुक आपसूकच वाट्याला येते.

########################################
घडलेल्या बऱ्या-वाईट घटनांमधून योग्य तो धडा घेतला नाही तर निकाल नकोसाच लागतो!!!

########################################
आयुष्य जगताना प्रत्येकाचा, प्रत्येक गोष्टींचा प्राधान्यक्रम वेगळा असू शकतो मात्र,
झालास का पास? किती टक्के?
भेटली का नोकरी, टेम्पररी की पर्मनंट?
घेतला का फ्लॅट, वन बीएचके की टू बीएचके ?
कोणती गाडी, टू व्हीलर की फोर व्हीलर?
कुठं जुळतंय का, अरेंज की लव्ह मॅरेज?
हलला का पाळणा, पेढा की बर्फी?
ऍडमिशन, स्कुल,पॅटर्न,प्रोमोशन,पगार अशी न संपणारी प्रश्नांची यादी.
या साचेबद्द प्रश्नांमुळे आयुष्य एकसुरी होते, आणि जगायचेच राहून जाते. अशा प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी रोज मरावं लागते. ज्याला खरोखर मनमुराद आयुष्य जगायचे त्याने अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या फार जास्त भानगडीत न पडता, रोज आपण जगतोय की मरतोय या प्रश्नांचे उत्तर शोधावं.

                                                                                                                                                        संतोबा...

Tuesday, October 2, 2018

मी आणि माझी अहंकारीक वचने - १३

तो फेकतो आणि बरेचजण लागोलाग कामधंदा सोडून फेकलेले कसे फसवं आहे 
हे सिद्ध करू लागतात! हीच त्याची खरी ताकद आहे.
#आभाळ_फाटलंय_मुद्द्याचे_बोला

*********************************************************************************
अभ्यास किती केला ते सांगू नको,
मार्क्स किती मिळाले ते सांग.

*********************************************************************************
भावड्या, दुसऱ्याची उणी-धुणी काढून, बदनामी करून त्याची जागा तू पटकावू शकणार नाहीस,
त्यापेक्षा त्याच्या दहा टक्के चांगली कामे केली असती तरी तुझी स्वतःची जागा निर्माण झाली असती!
#धोबी_का_कुत्ता_न_घरका_न_घाट_का

*********************************************************************************
ज्यांचा तुम्ही ते वाईट समजून द्वेष करता व स्वतःच्या चुका झाकण्यासाठी त्यांच्याशी तुलना करता,
त्यावेळी ते वाईट असतील वा नसतील पण तुम्ही मात्र त्यांना आदर्श मानून त्यांच्या मार्गावर 
चालत आहात असा त्याचा अर्थ होतो.
त्याचबरोबर तुम्ही स्वतःकडे अक्कल हुशारीची कमतरता आहे याचेही प्रदर्शन करता !!!

*********************************************************************************
भावड्या, एक लक्षात येतंय का तुझ्या, त्याला झाकता झाकता तू उघडा पडत आहेस!!!

*********************************************************************************
भावड्या मी तुझ्याशी वाद घालतो म्हणून मी पप्याच्या बाजूने आहे असं समजू नको. 
तुमची कपडे संभाळण्याव्यतिरिक्त इतर देखील महत्वाची कामे असतात एवढे लक्षात ठेव.

*********************************************************************************
                                                                                                       संतोबा (संतोष गांजुरे).

मी आणि माझी अहंकारीक वचने - १२

राजकारण्यांचे वांझोटे समाजकार्य म्हणजे स्वतःचे राजकीय अज्ञान आणि कर्तव्याची 
नसलेली जाण लपवण्यासाठी शोधलेली पळवाट.

*********************************************************************************
त्या दोघांची रोज ऑफिसात कडाक्याची भांडणे होतात, याचा अर्थ  
त्यांचा घटस्फोट होईल या भ्रमात राहू नका! ऑफिसबाहेर त्यांचा संसार सुखनैव चालू आहे.
थोडावेळ आहे अजून 'हात'मिळवणी करून नीट "काम" करा नाहीतर 
पंचवार्षिकपितृपक्षात मुहूर्ताअभावी पाचवर्षे ताटकळत रहावे लागेल.

*********************************************************************************
चिन्या तू त्या बाळ्याशी तुझी तुलना करायची सोडून दे. 
बाळ्या आयटीआय करून चांगल्या नोकरीला लागलाय, घरदार संसार थाटलाय 
आणि तुला लका लय हुशार समजून इंजिनीअरिंगला पाठवलं 
अन तू अजून चाळीशीत आला तरी प्रबंधच लिहितोय.

*********************************************************************************
मी कोणाला काही म्हणलं, कोणावर टीका केली, अगदी चेष्टेत एखाद्याला 
जोकर म्हणलं तरी ते मी भावड्यालाच उद्देशून बोललो असे तुला का वाटते?
एवढेच काय तर मी सोन्याचं कौतुक केले तरी त्याआडून भावड्यावरच 
टीका केली असे तुला वाटते, खरेच भावड्या एवढा वाईट आहे का रे?.

*********************************************************************************
आमच्या लहानपणी खिरीत शेवया आणि तळ्यात कमळ कधी मिळालंच नाही.
आमच्या नशिबात तांदळाची खीर अन जलपर्णीची फुलंच होती.
#गावाकडचे_ग्रेट_स्ट्रगलर्स!!!

*********************************************************************************
                                                                                                 (संतोबा)संतोष गांजुरे.

मी आणि माझी अहंकारीक वचने - ११

माझी "यशस्वी उद्योगपती व्हा" ही व्याख्यानमाला यशस्वी झाली नसती तर मलाही
 कुठे तरी रोजंदारीच करावी लागली असती.

*********************************************************************************
लाखों रुपयांची बिदागी घेणारे कीर्तनकार, मला "स्टँडअप कॉमेडीयन" पेक्षा वेगळे वाटत नाहीत.

*********************************************************************************
जर माझ्या आयुष्यात शनाया आली तर तू राधिका होशील का?
३०० कोटींची कंपनी हस्तगत करशील का?
#तुझ्या_सवतीचा_नवरा

*********************************************************************************
काही लोक्स आयुष्यभर कष्ट करून मोठं होण्याचा प्रयत्न करतात आणि काही
क्षणभरात लग्न करून मोठे होतात🙂.

*********************************************************************************
विराट एकटाच संपूर्ण संघाच्या अर्धे रन्स काढणार असेल तर
किमान नॉन प्लेइंग कॅप्टन म्हणून अनुष्काला खेळवायला हरकत का असावी???

*********************************************************************************
लग्नपत्रिका, फ्लेक्सवरील तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांची भली मोठी यादी पाहून, 
शेतमजुरांच्या कमतरतेच्या समस्येवर उतारा सापडल्यासारखे वाटतं.

*********************************************************************************
शेलार- चला गणपती बुडवायला.
वाळिंबे-आमच्यात विसर्जन करतात.
(शेलार-वाळिंबे जोरदार वाद)
वाळिंबे- काय रे संतोबा,बरोबर ना! 
संतोबा- दोघेही बरोबर आहात. वाळिंबे प्राणप्रतिष्ठापणा करतात म्हणून विसर्जित करतात, 
शेलार बसवतात म्हणून बुडवतात.

*********************************************************************************
                                                                                       (संतोबा)संतोष गांजुरे.

मी आणि माझी अहंकारीक वचने - १०

तुमचे गैरसमज, रुसवे-फुगवे, मानापमान हे सगळं पाहण्यात माझे अर्धे आयुष्य गेलंय. 
आता तुम्ही ते सगळं आयुष्यभर जपून ठेवा. माझ्या जगण्याच्या संघर्षात आता त्यासाठी वेळ नाही.
#सख्खे_सोयरे_पक्के_वैरी# 

*********************************************************************************
तुम्ही मला सोडून गेल्याच्या दुःखापेक्षा, तुम्ही सगळे एकटे पडल्याचे दुःख अधिक आहे.
तुम्ही रक्ताची नाती तोडलीत, 
मी माणुसकीची नाती गुंफत चाललोय.

*********************************************************************************
पूर्वी भाऊ म्हणजे आधार आणि बहिण म्हणजे प्रेम असे काहीसं ते नाते होते,
आता भाऊ म्हणजे आरोपी आणि बहीण म्हणजे दहशत असे ते झालंय.
#पाशवी_स्त्री-पुरुष_समानता_विजय

****************************************************************************************

पैशांमुळे लोकांना जमिनींचे मोल कळले आणि मला जमिनीमुळे पैशांचे!

*********************************************************************************
मी केलेल्या सर्व्हेमधून जे लोक उधारी, उसनवारी करतात त्यांना स्मृतिभ्रंशाचा विकार जडला असल्याचे दिसून आले आहे!!!

*********************************************************************************
लोकं जर आपली विनाकारण बदनामी करत असतील तर आपणच आपली एवढी बदनामी करायची की,
 त्या लोकांनाच आपल्याबद्दल सहानुभूती वाटायला हवी!!!

*********************************************************************************
ज्याची सावलीच पडत नाही तो कितीही मोठा झाला तरी वांझोटाच ठरणार!!!
#आधारस्तंभाच्या_छत्रछायेत

*********************************************************************************
                                                                                           (संतोबा)संतोष गांजुरे.

मी आणि माझी अहंकारीक वचने - ९

बदल घडत नसतो, तो घडवायला लागतो.
नुसत्या शिळोप्याच्या गप्पा मारून काहीही साध्य होत नाही.

*********************************************************************************
स्वतःला स्वतःची ओळख नसली की जीवन जगणे अवघड होऊन बसते.

*********************************************************************************
भावड्या, समोर खड्डा आहे हे मी तुला सांगून सुद्धा तू तसाच पुढे जाणार असशील तर,
तू त्या खड्डयात पडल्यानंतर मी तुझ्या मदतीला यावे अशी अपेक्षा करू नको.

*********************************************************************************
बदल्याची भावना मनात ठेवून सर्वांगीण बदल(चांगला) घडवता येत नाही.

*********************************************************************************
ज्या कायद्याला तुम्ही वाकवू शकता तोच कायदा एखाद्या दिवशी तुम्हाला सरळ करू शकतो, 
हे कायदा वाकवण्याची भाषा करणाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे.

*********************************************************************************
तुम्हाला दिलेल्या सेवेचा मोबदला तुमच्या खिशात पैसे असताना, 
आदरयुक्त प्रेमाने समोरचा नाकारतो ती तुमची श्रीमंती.
आणि तरीही तुम्ही कोणाचा एक रुपयाही देणे बाकी ठेवत नाही हा तुमचा मोठेपणा.

*********************************************************************************
पुण्याला देशातील जगण्यासाठी सर्वांत चांगले शहर घोषित करण्यापूर्वी केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याच्या जबाबदार अधिकाऱ्याने हडपसर ते हिंजवडी प्रवास करून पहिला असेल का?

*********************************************************************************
उत्पादने देशभक्तीच्या तराजूत मोजण्याऐवजी गुणवत्तेच्या तराजूत मोजली तर.....

*********************************************************************************
तुम्ही प्रशासकीय अधिकारी झालात ! अभिनंदन!!!
आता आपले कर्तव्य नेकीने पार पाडा.
बोल बच्चनगिरीच्या फंदात पडू नका, त्यासाठी स्वयंघोषित तज्ञ आहेत.

*********************************************************************************
एमपीएससी, युपीएससी चा अभ्यासक्रम थोडा सोपा करायला काय हरकत आहे? उमेदीच्या काळातील चारदोन वर्षे अभ्यास करण्यात खर्ची घालवून चमकणारे भावी अधिकारी प्रत्यक्ष कर्तृत्व दाखवायची वेळ येते त्यावेळेस खच खात असतील का? कारण काही सन्माननीय अपवाद वगळता कोणी काही रचनात्मक, सृजनशील, आवाक्याबाहेरचे काम केल्याचे दिसून येत नाही. यांची सारी शक्ती, बुद्धी अभ्यास करण्यात तर खर्च होत नसेल?

*********************************************************************************
                                                                                                (संतोबा)संतोष गांजुरे.

Thursday, June 21, 2018

मी आणि माझी अहंकारीक वचने --- ७

                 अपप्रवृत्तींना जेवढी मोकळीक द्याल तेवढी त्यांची ताकद वाढत जाते. आज आपण सुपात आहोत म्हणून गहाळ बसलो तर उद्या जात्यात भरडल्याशिवाय राहणार नाही! त्यामुळे अपप्रवृत्तींना वेळच्या वेळी ठेचून काढले पाहिजे नाहीतर त्या एकदा मानगुटीवर बसल्या तर आपली सुटका केवळ अशक्य !

******************************************************************

मानवाची प्रगती!!!
वाघ,सिंह म्हणलं की प्रतिष्ठा,
गाढव,माकड,कुत्रं म्हणलं की अपमान.
पण माणसाला माणूस म्हणून मान्यता आणि प्रतिष्ठा भेटेल काय? 

******************************************************************

श्रेष्ठत्वाचा अतिरेक फार वाईट! आपण वा आपला समूहच फार श्रेष्ठ हा अहंकार आपणांस दुर्मिळ बनवतो आणि दुर्मिळ गोष्टी फार काळ टिकत नाहीत.

******************************************************************

वेळेआधी आणि योग्यतेपेक्षा जास्त मिळाले की तोल ढासळतोच.

*****************************************************************

एकवेळ नितीमान शत्रूपासून बेसावध राहिलं तरी चालेल पण 
हीन मनोवृत्तीच्या लोकांपासून कायम सावध राहिले पाहिजे.

****************************************************************
                                                                                                               (संतोबा)संतोष गांजुरे.

मी आणि माझी अहंकारीक वचने --- ६

           आपणांस ज्या क्षेत्रात कार्य करायचे आहे त्या क्षेत्रातील ज्ञान,कौशल्य आणि अनुभव हा हवाच फक्त इच्छा आणि हौस असून चालत नाही. समजा तुम्हाला शेती करायची आहे अन तुम्हाला गवत आणि गव्हाचे तृण यातील फरक कळत नसेल, कलिंगडाचे मोठं झाड असते की वेल असतो हे माहित नसेल , गाजर जमिनीच्या खाली येतं की वर येते हे साधं माहिती नसेल तर कसं होईल?

या विषयी तुकोबाराय म्हणतात
निवडी वेगळे क्षीर आणि पाणी. 
राजहंस दोन्ही वेगळाली. 
तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. 
येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.

येथे तुकोबारायांना जात अपेक्षित नसून कौशल्य अपेक्षित आहे.

***************************************************************************************************************

           डोळ्यांतील चमक आणि चेहऱ्यावरील तेज, भाव बुद्धिमतेची,संस्काराची आणि नेक कर्तृत्वाच्या दृष्टीची झाक दर्शवत असतात. ती झाक, ते तेज तूप रोटी खाऊन आणि ढोंगबाजी करून कोणा बुजगावण्याच्या चेहऱ्यावर येत नसतेय ते अंगभूत असावे लागतेय.

**************************************************************************************************************

                 अगदी सर्वसामान्य व्यक्तीला मिळालेलं एखादे पद त्या व्यक्तीची समाजातील प्रतिष्ठा, मानमतराब वाढवत असते व काही व्यक्ती इतक्या कर्तृत्ववान असतात की त्यांच्यामुळे त्या पदाची प्रतिष्ठा वाढते व त्या व्यक्तीचे कार्य एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे पुढे त्या पदावर विराजमान होणाऱ्या व्यक्तीला मार्गदर्शक ठरत असते. 
पण एखाद्या व्यक्तीची नियत आणि कुवतच इतक्या खालच्या दर्जाची असते की त्या व्यक्तीची नसलेली आणि पदाची असलेली प्रतिष्ठाही धुळीस मिळते.

*************************************************************************************************************

                                                                                                                      (संतोबा)संतोष गांजुरे.

Sunday, July 21, 2013

मी एक राजपुत्र.......

                मित्रा, मी इतक्या दूरवरून फक्त तुझ्या यशाबद्दल अभिनंदन करण्यासाठी आलो होतो. पण तुला तुझ्या यशापेक्षा माझ्या क्षणभंगूर अपयशाचा एवढा आनंद व्हावा याचे मला आश्चर्य वाटतेय? आणि मी अपयशी झालोय हे फक्त तुम्हाला वाटतेय, तुला माझी आणि मला तुझी काय स्वप्ने आहेत ती माहीत नाहीत का?. माझी स्वप्ने चार-चौघांसारखी नाहीत, खरेतर माझे स्वप्न एक वेडेपणाच आहे पण अजूनही मी त्या वेडेपणाला चिकटून बसलो आहे. तू मात्र तुझ्या स्वप्नांत गरजेप्रमाणे हवा तसा फेरफार करून जिंकल्याचा जल्लोष करतोय, अर्थात त्याबद्दल माझी काहीच तक्रार नाहिये, फक्त काही करून तू खुष असावे एवढीच प्रामाणिक इच्छा आहे. दु:ख याचेच वाटते की, तू माझा जिवलग मित्र आहेच शिवाय तुला माझे ध्येय व त्यासाठीचे माझे प्रयत्न त्याग याची पूर्ण जाणीव आहे तरीसुध्दा तू मला दोष देत आहेस. पण कधी-कधी असेही वाटते की मला एवढ्या भरभरून संधी मिळत असताना देखील मी माझ्या ध्येयाला चिकटून आहे म्हणून तर तुम्हा सर्वांचा जळफळाट होत नाहीये ना?.

                चांगली नोकरी,सुंदर बायको, टू बीएचके फ्लॅट एवढी सामान्य स्वप्ने दोघांचीही नव्हतीच. याचा अर्थ या गोष्टी आपल्याला नको होत्या अशातला भाग नाहीये, तू त्या मोठ्या कष्टाने,स्वकर्तुत्वाने मिळवल्यात त्याचा मला खरेच खूप अभिमान आहे, पण आपली ध्येय गुंडाळून त्या पूर्ण कराव्यात असे मला वाटत नव्हते. मलाही या गोष्टी आज ना उद्या मिळतील मला कसलीच घाई नाहिये. कारण त्या मिळणारच आहेत,त्याबरोबरच मला ध्येयही गाठता येईल याची मला पूर्ण खात्री आहे म्हणून. पण मी त्या दृष्टीने काहीच हालचाल वा प्रयत्न करत नाही ह्या आरोपाशी मी बिल्कुल सहमत नाहीये, उलट ही एक कठोर तपश्चर्या आहे. कारण मी एक भोगी व्यक्ती आहे, तसेच बरेच काही उपभोगण्यासाठी सहजासहजी उपलब्ध असतानाही एखाद्या योग्याप्रमाणे सर्वाचा त्याग केला आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. हा माझा बचाव नाहीये. हे माझे स्पष्टीकरण फक्त सध्या व पुढे काही गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून आहेत बाकी काही नाही. एखाद्याने मला चांगले म्हणावे म्हणून काही करण्याची मला गरज नाहीये.  मी कसा आहे ते मला चांगले माहीत आहे त्यासाठी कोणाच्या कसल्याही प्रमाणपत्राची मला गरज नाहीये.
                शेवटी एकच सांगतो तुम्ही कोणीही असा, पण मी एक राजपुत्र आहे हे लक्षात ठेवा आणि एका राजपुत्राचे असते तेच माझे स्वप्न आहे त्यापासून मी तसूभरही ढळणार नाही भले त्याबदल्यात मला कसलीही किंमत मोजावी लागली तरी बेहत्तर. "वर्षा" हेच एकमेव ध्येय,स्वप्न सर्व काही आहे माझ्यासाठी आणि मी ते प्राप्त करणारच ते सुद्धा स्वकर्तुत्वावर आणि नीतिमत्तेने. ज्यादिवशी मी हक्काने, मानाने वर्षावर जाईल त्यावेळेस तुम्ही माझ्यासोबत असल्यास मला आनंदच होईल. तुम्ही माझ्याशी कसेही वागलात तरी तुमच्याबद्दल माझ्या मनात कसलाही आकस असणार नाही. पण एक त्यादिवशी तुम्ही सर्वांनी माझे राजेपण खुल्यादिलाने मान्य करायचे आणि ते आपण धुमधडाक्यात साजरे करू!!!!
               
Saturday, June 15, 2013

मी आणि माझी अहंकारीक वचने --- ५

आयुष्यभर अपराधीपणाचे ओझे वाहण्यापेक्षा अपराध छोटा असो वा मोठा तो तत्काळ मान्य करणे केव्हाही श्रेयस्कर!!!
***********************************************************************
माझा तुमच्या देवावर विश्वास नाहीये, मी असा दगड शोधतोय ज्यावर मला डोळे झाकून विश्वास ठेवता येईल. भले माझ्या यशानंतर तुम्ही त्याचा देव केला तरी चालेल!!!!!!!!!!!!!
************************************************************************
जगासाठी आपण चांगले असणे ही आपल्या स्वत:साठी सर्वात वाईट गोष्ट आहे.
************************************************************************
ज्यांनी आपल्या ध्येयाशी तडजोड केली आहे ते सर्वजण त्यांच्याच नव्हे तर जगाच्या दृष्टीनेही यशस्वीच आहेत....
************************************************************************
सर्व गोष्टी जर माझ्या मनासारख्या झाल्या असत्या तर आज मी काहीच करू शकलो नसतो
************************************************************************
विवाहित मुलीचे आई-वडिलांप्रती असलेले प्रेम वळवाच्या पावसासारखे असते, वर्षातून एखादेवेळेसच अवचित येणारा वळीव सोसाट्याचा वारा,मेघांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटांसह येऊन आपल्या आगमनाची वर्दी अखंड आसमंताला देत क्षणात धो-धो बरसून नाहीसा होतो, नंतर सारे कसे शांत सुने-सुने........
तर मुलाचे प्रेम म्युनिसिपालीटीच्या पाण्याच्या नळासारखे.... सर्वांची रोजचीच तक्रार असते पण त्याशिवाय जगताही येत नाही...
************************************************************************

Tuesday, October 2, 2012

मी आणि माझी अहंकारीक वचने --- ४

माझ्यासारखा नास्तिक कधीही कोणाही देवाच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत नाही, झालाच तर कधीतरी एखाद्या सुंदर मुलीच्या गळ्यातील लॉकेट मधील प्रतिमेसमोर होतो तोही देवासमोर नतमस्तक होण्यापेक्षा त्या देवाच्या मंदिराच्या गाभार्‍याच्या दर्शनासाठी होतो...
 ********************************************************************
स्त्रीसौंदर्याची व्याख्या पुरुषांच्या गरजेनुसार बदलू शकते.
  ********************************************************************
आता संस्कार वैगेरे गोष्ठी गुंडाळून ठेवण्याची वेळ आली आहे. आता मला मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा,अन्यथा जगण्याला काही अर्थच राहणार नाही.जास्त मुलांचा मामा बनणे ही काय अभिमानास्पद गोष्ट आहे असे आता तरी मला वाटत नाही.
  ********************************************************************
सौंदर्याचा आस्वाद(उपभोग) घेतल्यानंतर त्याबद्दलची आसक्ती कमी होईलच असे कोणीही छातीठोकपणे नाही सांगू शकत!!!!!!!!!!!!!!
  ********************************************************************
 सहज केलेल्या त्यागामधून मिळणार्‍या आनंदाची व समाधानाची कोणत्याही सुखाशी तुलना होऊ शकत नाही, आणि असे नसेल तर तर तो त्याग नसून नाइलाजाने केलेली तडजोड आहे हे निश्चित समजावे!!!!
  ********************************************************************
मी सर्व ब्रॅण्डेड वस्तू वापरतो अर्थात आर्थिकदृष्ट्या हे मला परवडत नाही पण मला त्याच कम्फर्टेबल वाटतात,कारण एकतर त्यात फसण्याची शक्यता नसते तसेच त्या शेवटपर्यंत आहे तशाच राहतात. यदाकदाचित मुलीबाबत हे शक्य झाले असते तर!!!!!!!!!
  ********************************************************************
गुडघ्याला बाशिंग बांधल्यापासून माझा पाय सतत घसरू लागलाय!!!!!!!!!!
  ********************************************************************
उपवर मुले जर खोटे नाही बोलली तर जवळपास सर्वच उपवर मुली अविवाहित राहतील...आजन्म!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
  ********************************************************************
कृतीवर तर नियंत्रण,संयम ठेवलाय तोही संस्कार व परिस्थितीमुळे पण वृत्तीवर नाही,तसा कोणी ठेऊही शकत नाही. मागणी तसा पुरवठा नाही झाला तर बंड हे होणारच !!!!!!!!!!!!!!
 ********************************************************************
 
            ----संतोष गांजुरे  

Wednesday, September 19, 2012

मी आणि माझी अहंकारीक वचने -- 3

खुप कष्ट करुन देखिल तुम्हाला पैसा मिळत नसेल तर काळ्जी करु नका, उलट खुश व्हा कारण भविष्यकाळात अमाप मिळणार्‍या पैशासाटी तुमची झोळी मजबूत करण्याचे काम चालु आहे याची खात्री बाळगा...
******************************************************
माझ्याकडुन असंख्य गुन्हे घडले तरी चालतील नव्हे ते घडावेत अशी माझीच इच्छा आहे.कारण आज मी जे गुन्हे करणार आहेत ते ऊद्या आदर्श ठरल्याशिवाय राहणार नाहित याची मला पुर्ण खात्री आहे.
 ******************************************************
आतापर्यंत बाई आणि बाटलीच्या जोरावर अनेकांनी आपआपली साम्राज्ये उभी केली आहेत मीही तेच करणार आहे, फरक एवढाच की मी ते बाईला उभी आणि बाटलीला आडवी करून करणार आहे!!!!!
 ******************************************************
मी खुप वाईट आहे हे मला माहीत आहे पण जे स्वत:ला चांगले समजतात त्यांच्या इतका नक्कीच नाही, हे ही मला माहित आहे.
******************************************************
मला ज्या गोष्टींचा राग येतो त्या मी इतराबरोबर कधीही करत नाही आणि कोणी केलेल्या ही मला आवडत नाही.
 ******************************************************
 आज ज्या गोष्टींचा आपल्याला अभिमान वाटतो कदाचित त्याच गोष्टींची उद्या लाज वाटू शकेल.
 ******************************************************
मुलींना पुरुषांच्या नजरेत काय आहे ते लगेच ओळखता येते तर मग इतक्या मुलींचा बळी का जातो हेच समजत नाही!
 ******************************************************
कोणतीही गोष्ट अनपेक्षितपणे घडत नसते.
एखाद्याला जेव्हा खुप मोठे यश मिळते,तेव्हा सर्वजण त्याला हे अनपेक्षित भेटले असे समजतात! पण ते यश समाजासाठी अनपेक्षित असते त्या व्यक्तिसाठी नव्हे!
ते यश मिळवण्यासाठी त्याने खुप कष्ट केलेले असतात,खुप काही गमावलेलेही असते.खुप अवहेलना सहन केलेली असते.
आपण मात्र सोइस्कररित्या नेमक्या त्याच गोष्टी विसरतो!
******************************************************
जग बदलवणे काहीच अवघड नाहिये...
...
पण प्रथम स्वत:ला बदलायला हवे!!!!
******************************************************
ज्या पैशांमुळे काल पर्यंत मला किमंत नव्हती आज मी त्या पैशाला काडीचीही किमंत देत नाही.
 ******************************************************
आकाशी झेप घेणे अवघड नाही.....
....
पण टिकून रहाणे तोपर्यंतच शक्य आहे जोपर्यंत तुमचे पाय जमिनीवर आहेत!!!!
******************************************************
पैशाशिवाय शहाणपण नाही हे खरे आहे पण...
शहाणपणाशिवाय तरी पैसा कसा मिळणार !!!
आधी शहाणपणा अंगी बाणवा नंतर शान आणि शहाणपणा दाखावण्यासठी पैसा कमवा !!!!
 ******************************************************
माझी श्रीमंती मी पैश्यापेक्षा माझ्या सोबत असलेल्या मित्र जवळच्या माणसांवरूनच मोजण्याचा
प्रयत्न केला.पण सर्वांनाच प्रेमाणे जोड़ता येते असे नाही,काहीना पैसा status ही हवे असते!
पैसा हाच माणसे जोडण्याचा short-cut आहे,हे माझ्या कधी लक्षात आले नाही!!!
..पण जे माझ्यासोबत आहेत ते मला कधीही सोडून जाणारे आहेत याचा मला अभिमान अणि पूर्ण विश्वास आहे.
...कारण पैसा हा टिकाऊ नाहिये आणि त्याने जोडलेली माणसेही!!!!!!!!!!
******************************************************

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!