Ads 468x60px

Saturday, September 8, 2012

अनुभव (तात्विक)



      ऊद्या जेव्हा माझी मुलगी आगीशी खेळायला जाईल त्यावेळी मी तिला बिल्कूल अडवणार नाही कारण आगीची व भाजण्याची कितीही भिती दाखवली तरी भाजणे म्हणजे काय याची तिला जाण नसल्याने तिला आगीचे आकर्षण नेहमीच राहिल घरात कोणी नसताना मोठा अपघात होण्यापेक्षा आपल्या समोरच थोडेसे भाजले तर काय फ़रक पडतो आपण आहोतच ना तिला सावरायला.हजारदा भाजेल भाजेल असे ओरडून सांगण्यापेक्षा त्याचा अनुभव दिला तर आयुष्यात पुन्हा ती आगीच्या जवळ जाईल काय?

            -----संतोष गांजुरे

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!