अजब हा न्याय या मुलकी.
निवडून ती शेंग शेलकी,
बदला राखिला मुलाबाळांसी,
अन्नदात्याची पोरं ती उपाशी.
मालक मी या माळव्याचा,
परि आधार ना दिड-दमडीचा.
दाता,भुमिपुत्र म्हणोनिया,
कोरडा सत्कार शब्दे करिती.
शेवाळल्या या शब्दांनी
फ़ाटका संसार माझा सांधेल काय?
पाहिला काल मी दोस्त माझा सखा,
कर्जाच्या काळडोहापायी झाडाशी लटकलेला.
त्याच्याहुनी ना गत माझी वेगळी,
आज त्याची उद्या माझी असेल बायको पांढऱ्या कपाळी.
आधी पिकं करपली अन आता मनंही,
चिंतेविण जगलो ना एक क्षणही.
दोष ना हा कुण्या परक्याचा,
शाप हा माझ्या मुकेपणाचा.
रोज-रोज मरण्याचा खेळ जीवघेणा ,
आज संपवायचा आहे.
त्यापुर्वी पोसलेल्या पांढऱ्या गेंड्याना,
जीवन माझे जगवायचे आहे!
---संतोबा (संतोष गांजुरे)
निवडून ती शेंग शेलकी,
बदला राखिला मुलाबाळांसी,
अन्नदात्याची पोरं ती उपाशी.
मालक मी या माळव्याचा,
परि आधार ना दिड-दमडीचा.
दाता,भुमिपुत्र म्हणोनिया,
कोरडा सत्कार शब्दे करिती.
शेवाळल्या या शब्दांनी
फ़ाटका संसार माझा सांधेल काय?
पाहिला काल मी दोस्त माझा सखा,
कर्जाच्या काळडोहापायी झाडाशी लटकलेला.
त्याच्याहुनी ना गत माझी वेगळी,
आज त्याची उद्या माझी असेल बायको पांढऱ्या कपाळी.
आधी पिकं करपली अन आता मनंही,
चिंतेविण जगलो ना एक क्षणही.
दोष ना हा कुण्या परक्याचा,
शाप हा माझ्या मुकेपणाचा.
रोज-रोज मरण्याचा खेळ जीवघेणा ,
आज संपवायचा आहे.
त्यापुर्वी पोसलेल्या पांढऱ्या गेंड्याना,
जीवन माझे जगवायचे आहे!
---संतोबा (संतोष गांजुरे)
0 प्रतिक्रिया:
Post a Comment