Ads 468x60px

Friday, September 7, 2012

घात (कविता)

एकनिष्ठतेची करोनिया होळी
प्रिये उतरवलीस का तू चोळी.
भ्रष्ठतेचा कलंक घेवोनिया भाळी
कोणाच्या बहकाव्यात खोडली तारुण्याची कळी.

मानिली मी तुझ माझी स्वामीनी
सर्व कामनांची कामिनी
वाटले मज बनूनी रणरागिणी
लढशील या दुर्जनांशी प्राणपणांनी.

अंहकार हा माझा वाहिला शब्दांत

विरले गर्वगीत नभांत
वासनेच्या या विक्राळ लाटेत
क्षणांत वाहिली पुण्यप्रभात

विश्वासाची वेशीवर टांगून लक्तरे
आता झाकतील लाज कोणती अस्तरे
सावरतील का मज सूर्य,चंद्र आणिक तारे
निर्जीव या भांवनांस फ़ुटतील का नवे धुमारे

वाटली मज तू लाखांत नेक
पण तूही त्यातलीच एक
दुध पोळण्याची ही शिक
आता प्राशीन फ़ुंकून ताक.

(नुकत्याच पुण्यात घडलेल्या sex scandal नंतरची माझी प्रतिक्रिया )

                                         -
 (संतोबा)संतोष गांजुरे.

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!