आई
मी तुझा आभारी आहे,
आकाशी झेपावण्याची नाही
जमिनीवर चालण्याची,
भविष्य जाणण्याची नाही निदान
भविष्य घडविण्याची ताकद दिल्याबद्दल.
मी तुझा आभारी आहे
असामान्य नाही
निदान सामान्य,
देव नाही तर नाही निदान
दानव न बनविल्याबद्दल.
मी तुझा आभारी आहे
शेरदिल नाही
निदान शेळपट,
दाता नाही तर नाही निदान
भिकारी न बनविल्याबद्दल.
मी तुझा आभारी आहे
फ़सवण्याची नाही
निदान न फ़सण्याची,
राम नामाची नाही तर नाही निदान
कामाची अक्कल दिल्याबद्दल.
मी तुझा आभारी आहे
नुसती बुध्दी वा ताकद नाही तर
दोन्ही दिल्याबद्दल,
अमरत्व नाही तर नाही
निदान जन्म दिल्याबद्दल.
-----संतोष गांजुरे.
0 प्रतिक्रिया:
Post a Comment