Ads 468x60px

Friday, September 7, 2012

माझे विडंबन

माझे विडंबन--(कणा - कवी कुसुमागज यांची माफ़ी मागून)

ओळखलंत का सर मला, month end ला आला कोणी

दाढी होती वाढलेली,साधीसुधी रहाणी

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
month end आला,Database फ़ाटला Alert देऊन

चार-चौघांची टोळी Application फ़ाटले म्हणून नाचली
Finetune केल्याशिवाय जाईल कशी नोकरी मात्र वाचली

तहान-भुख विसरून माझी Follow-up,updates घेतली
माणुसकी म्हणुन Cigarette तेवढी Offer केली.

Vendor ला घेऊन संगे सर आता Troubleshoot करतो आहे

Alert logs पाहून Bug fix करतो आहे

Laptop कडे हात जाताच हसत हसत उठला
Appreciation,Appraisal नको सर,Resignच करावसं वाटलं

Escalation झाले तरी नाही सोडला धीर एकही क्षणा

Mailbox open करून आता,Resignation accepted तेवढे म्हणा

                                                        (संतोबा)संतोष गांजुरे.

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!