जीवापाड प्रिती वेडया करिशी मजवर,
राहवेना तुझ मजवीण क्षणभर,
प्राशूनिया मज बेधुंद झिंगशी,
परि मी न बेवडा जगास सांगशी.
हिरावूनी सानुल्याच्या मुखीचा घास,
अन् गमावून सखीचा विश्वास.
काय हा मजशी एकरूप होण्याचा वेडा ध्यास,
दुःख विसरे पेल्यात हा तर एक आभास.
अनंत माझ्या जाती अन् राशी,
परि इमान राखला पिढीजात गुणांशी.
जाती-धर्मांनी बाटवले माणसांशी,
बुडविला हा विटाळ मी एका पेल्याशी.
जगी निर्मळ मजसम कोण?
झोपवण्या मज झटती सज्जन.
नर जोवरी भूवर मी न कुणा शरण,
वेश्येस ना वैधव्य ना मज मरण.
मीच विनवते तळीरामा सोड मज या क्षणा,
नको करू वेड्या आपल्यांशीच प्रतारणा.
मरणानंतरही होईल रे तुझी दैना,
तुजसाठी येतील अश्रू कोणाच्या नयनां ?.
---संतोष गांजुरे
---संतोष गांजुरे
0 प्रतिक्रिया:
Post a Comment