Ads 468x60px

Friday, September 7, 2012

माझी महिनाअखेर

महिना अखेर काय असते आज मला कळू लागलेय,
शाळेत अर्ध्यादिवसाच्या सुट्टीसाठी महिनाअखेरीची
चातकाप्रमाणे वाट पहाणारा मी आज-
देणे कर्यांची वाट चुकवू लागलोय .

भाडे,बिलं आणि देणी यात आर्थिक महिनाअखेर

पहिल्याच आठवड्यात सुरू होऊ लागलीये.
अन या महिन्यातील खरेदीचा संकल्प,
न चुकता पुढच्या महिन्यात ढकलू लागलोय.

घरात भांड्यांची आदळआपट सुरू झालीये.

अन ऑफ़िसात डेटाबेस फ़ाटू लागलायं.
 प्रत्येक येणार्या कॉलला "I am busy,I will call you later"
असा रिप्लाय जाऊ लागलायं.

सारं काही सावरता सावरता-

आता स्वतःच घसरू लागलोय.
पोटापाण्याची आग विझवण्यासाठी,
स्वतः मात्र जळू लागलोय.

नको ती महिनाअखेर, अन नको ती चाकरी,

आता असे वाटू लागलेय.
अन जळू साहेबाच्या तोंडावर राजीनामा फ़ेकून
आता "जय महाराष्ट्र" म्हणावेसे वाटू लागलेय!!
                                         (संतोबा)संतोष गांजुरे.

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!