Ads 468x60px

Monday, September 10, 2012

नटरंग

                     

रंगभुमीचा पोर मी अवली
आधार ना कुणाचा गडया,
जाणुनी दुःख मायबापांचे
हास्य फुलवितो बनूनी सोंगाडया.

विंचवाचे बिर्‍हाड  पाठीवरी
डांबली माया-ममता ऊरी,
मायबापा भेटण्या वणवण ही दाहीदिशी
अन रोज नवा संसार रंगमंचावरी.

विरे रोज सानुल्याची हाक टाळयात
अन लपे ओढ घराची रंगल्या चेहर्‍यात,
मेळ ना वेळेचा या खेळाखेळात
जागवी झोप पाणावल्या पापण्यात.

वेडावूनी कित्येक धडपडती
शोधण्या मुखवटे चंदेरी दुनियेत,
परी वाट किती बिकट जाणितो मी
अंतरीच्या जखमा आठवूनी त्यांस खाचखळगे दाखवितो मी.

रंगशारदेचा आर्शिवाद मज शिरी
तरी कोणी खेचती मज माघारी,
सांगतो तयांसी एक सहस्र तारे मजहूनी थोर इथे
परी जवाहीरावीण चमकलेला हिरा मी या रंगभुमी.

*नटरंग मित्र संजय मोहिते याच्या कार्यास सलाम*
                  संतोबा(संतोष गांजुरे)


0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!