Ads 468x60px

Wednesday, September 12, 2012

अनुभवाचे बोल

               प्रत्येक आई-वडिलांना आपला मुलगा डॉक्टर,इंजिनीअर व्हावा असेच वाटते, मात्र माझ्या अशिक्षित शेतकरी आईची इच्छा मी फक्त त्यांच्यासारखे बनू नये एवढीच होती. कारण काय चांगले ते तिला फारसे माहीत नव्हते पण काय वाईट आहे हे निश्चित माहीत होते..
             आज मी
इंजिनीअर  (माहिती तंत्रज्ञान अभियंता) आहे, तरीसुद्धा माझीही माझ्या अद्याप न जन्मलेल्या मुलांबद्दल तीच भावना आहे!!!!!!!!!

                                                                                            (संतोबा)संतोष गांजुरे.

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!