Ads 468x60px

Friday, September 7, 2012

एक चळवळ वळवळणारी नव्हे सळसळणारी! (भाषण)

                                    माझ्या आजुबाजूच्या सर्व सळसळत्या तरुणाईला माझा मानाचा मुजरा.तसेच एका अभुतपुर्व अशा सामाजिक क्रांतीचे साक्षीदार बनू पाहणार्‍या आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन!
          जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात रहात असल्याकारणाने आपण सर्व बाबतीत सुखी समाधानी आणि चिंतामुक्त असाल अशी अपेक्षा आहे कारण--
देशात भ्रष्टाचार बोकाळला आहे मात्र आता तोच शिष्टाचार झाल्याकारणाने तो आपल्या अंगवळणी पडला आहे.आपणही त्याचाच भाग बनल्याने त्याला विरोध असण्याचे कारण नाही. देशात रोज शेकडो शेतकरी आत्महत्या करत असले तरी आपल्या संवेदनाच बोथट झाल्याकारणाने तसेच अद्याप आपल्याला त्याची झळ पोहचली नसल्याने आपल्या मनात काही प्रतिक्रिया उमटण्याची किवा हळहळ वाटण्याची सुतराम शक्यता नाही.अन्नपदार्थातच काय सर्वच गोष्ठीत अगदी दुधातही जीवघेणी भेसळ होऊ लागलीये पण तरीही काही अडचण नाही कारण तेही आता आपण पचवू लागलोय.आया-बहिणींही सुरक्षित नाहीत तरीही घाबरण्याचे कारण नाही आता आपण त्यांना जन्म देणेच बंद केलेले आहे.
         गोरगरीब जनतेवर अन्याय होतोय पण त्यांना श्रीमंत,ताकदवान होण्यापासून कोणी रोखले होते काय असे आपण ती वेळ आपल्यावर येईपर्यंत म्हणू लागलोयच ना!.बेरोजगारी,गुन्हेगारी,मुलभूत पायाभूत गोष्ठींची कमतरता,भाषिक-प्रांतीक अस्मिता अशा अनेक अन्याय गोष्ठी आहेत पण आता त्या अंगवळणी पडल्या आहेत त्यामुळे त्यांची चीडही येत नाही व त्याविरूध्द लढावेसेही वाटत नाही.
         पण तरी सुध्दा कधी कधी आपल्यातील माणुसकी वा संवेदना जागृत झाल्याच तर हे सारे बदलावेसे वाटते पण ते आपण नव्हे तर "’राजे’, आपण पुन्हा जन्माला या" अशी निराशावादी हाक देऊन कारण आता आपले रक्तही भ्रष्ट झाले आहे.
तरी सुध्दा---
          हे सर्व पाहून,अनूभवून खरचं मित्रांनो तुमचे तरूण रक्त उसळत नाही का? होणार्‍या अन्यायाविरूध्द संघर्ष करावासा वाटत नाही का?का खरेच आपले रक्त भ्रष्ट,मृत झाले आहे?
         मला मात्र असे बिल्कूल वाटत नाही. अजूनही आपली महाराष्ट्राची भुमी इतिहास घडविण्याबाबत व युगपुरुष जन्माला न घालण्याइतपत वांझोटी झालेली नाहीये.
         आपल्या मध्ये अजूनही जग जिंकण्याची जबरदस्त ताकद,इच्छाशक्ती आहे गरज आहे ती आपल्यामधील स्पुल्लिंग चेतवण्याचे कारणआपल्या विचारावर निराशेची राख साचल्यामुळे आपले विचार निस्तेज झाले आहेत. त्या राखेवर एक जोरदार फुंकर घालून आपल्यामधील स्पुल्लिंग पेटल्यानंतर त्या आगीत सर्व जगातील अन्याय जळून राख होईल व तसेच त्या स्पुल्लिंगाच्या प्रकाशात सर्व जगाचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही.
           किती दिवस राजकारण्यांना शिव्या देऊन परत त्यांनाच निवडून देणार आहोत, आपल्याकडे पर्यायच उपलब्ध नाहीये. अजुन किती दिवस कोणी काही करेल याची वाट पाहायची आहे. ही अडचण नसून एक सोनेरी संधी आहे इतिहास घडवण्याची. आता नुसती सामाजिक क्रांती करून भागणार नाही तर त्यासोबतच राजकीय क्रांतीचीही गरज आहे आणि त्यासाठी आपला सहभाग महत्वपूर्ण आहे. आता कोणी आपल्यासाठी काही करेल यापेक्षा आपण या समाजासाठी काही तरी करूया असा विचार करून त्यादृष्टीने प्रयत्न करूया. ही एका अभूतपूर्व सामाजिक व राजकीय क्रांतीची सोनेरी पहाट आहे गरज आहे ती फक्त आपण जागे होण्याची.
(आपल्याला पडणार्‍या सर्व प्रश्नाची उत्तरे न विचारताच मिळतील याची खात्री बाळगा.)

                      ---संतोबा(संतोष गांजुरे)

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!