Ads 468x60px

Monday, September 10, 2012

नामांतराचे राजकारण


    राजकारणात पवारसाहेबांचा(शरद पवार) कोणी हातच काय काहीच पकडू शकत नाही.ते एक जबरदस्त राजकिय महत्वकांक्षा आणि कुशाग्र बुद्धीमत्ता असलेलं जागतिक दर्जाचं व्यक्तिमत्व आहे.
.कोणाला कुठे,कसे,कधी खिंडीत गाठायचे आणि त्यानंतर त्याचे काय करायचे हे कौशल्य त्यांच्याइतके कोणालाच अवगत नाहीये.स्थानिक व राष्ट्रीय राजकारणात भरीव कामगिरी केलेली असताना आणि स्वतःचे घरदार सांभाळून घरादाराप्रमाणेच राज्याच्या प्रगतीस भरीव हातभार लावून सुद्धा राज्यातील सर्वसामान्य जनतेस त्यांच्याप्रती आदर,अभिमान वाटण्यापेक्षा तिरस्कारच जास्त वाटतो, कदाचित त्यांची राजकिय अतिमहत्वकांक्षा व सर्वसामान्य जनतेच्या मनातील धुर्त राजकारण्याची प्रतिमा जबाबदार असू शकेल.
      साहेब ज्याकोणाला खिंडीत पकडतात त्यावेळी त्याच्यासमोर कोणताच पर्याय शिल्लक राहत नाही.ज्याप्रमाणे एखाद्या गुंडाने निर्जन ठिकाणी एखाद्या सुंदर मुलीला एकतर मी तुझ्याशी लग्न करतो किंवा तू तरी माझ्याशी लग्न कर असे बोलल्यानंतर जशी त्या मुलीची अवस्था होईल अगदी तशीच अवस्था त्या व्यक्तीची होते.आताही दादर स्थानकाच्या नामांतराचे पिल्लू सोडून त्यांनी शिवसेना-भाजपची तशीच अवस्था केली आहे.रामदास आठवल्यांच्या रिपब्लिकन पक्षाशी नुकताच घरोबा केल्याने शिवसेना-भाजप नामांतराला पाठींबा द्यावा कि विरोध करावा अशा कात्रीत सापडले आहे.
      पवारसाहेबांची ही खेळी काही नविन नाही.समाजात फ़ुट पाडण्याव्यतिरिक्त यात दुसरा कोणताही हेतू नाही.दादर स्थानकाचे चैत्यभुमी असे नामांतर केल्याने दलितांचा उत्कर्ष वा बाबासाहेबांचे स्वप्न पुरे होईल अशातला भाग नाही.दलितांचा उत्कर्ष करण्याचा पवारसाहेबांचा हेतू असता तर चार वेळा मुख्यमंत्री होऊनही दलितांची अशीच झोपडपट्टीत राहण्याची परिस्थिती राहिली नसती व ह्या आरक्षणाच्या कुबड्या बाळगण्याचीही गरज पडली नसती.वैयक्तिकरित्या माझा याच काय कोणत्याही नामांतराला विरोध राहीन कारण कोणत्याही नविन प्रकल्पाला नाव देताना तुम्हाला फ़ुले-शाहू-आंबेडकर-छ.शिवाजी महाराज व इतर समाजसुधारक आठवत नाहीत? आणि गरज पडली की राजकिय स्वार्थापोठी या महापुरुषांचा बाजार मांडून समाजात फ़ुट पाडता!उद्या हे स्वार्थी राजकारणी लोक स्वत:च्या बापाचे नामांतर करायला मागे-पुढे पाहणार नाहीत, अर्थात आमची त्यास काही हरकत असण्याचे कारण नाही, फ़क्त बापाच्या नावाबरोबर आईचे ही नाव बदला कारण आम्हाला आमच्या आईबद्दल जेवढे प्रेम,आदर आहे तेवढाच तुमच्या आईबद्दलसुद्दा आहेच तेव्हा तिची अशी बदललेल्या बापाबरोबर नाव जोडण्याची विटंबणा आम्हाला सहन होणार नाही.
      माझी सर्व तरुण मित्र-मैत्रिणींना विंनती आहे कि,तुम्ही कोणत्याही राजकिय पक्षाच्या दावणीला बांधले जाऊ नका कारण कोणताही पक्ष विश्वासार्ह राहिलेला नाही मग तो सत्ताधारी असो वा विरोधी!तुम्ही नामांतराला पाठींबा किवा विरोधही करू नका कारण त्याने काहीही फ़ायदा वा बदल होणार नाहिये.आपल्याला फ़क्त आता एकजूठ होऊन ही निष्क्रिय राजसत्ता उलथवून टाकायची आहे,राजकिय पक्षांना नेहमीप्रमाणे शिव्या-शाप देऊन व पुन्हा त्यांनाच निवडून देउन निराशेशिवाय काहीही हाती लागणार नाही.आता सत्ता हस्तगत करण्याची आणि त्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे.मला खात्री आणि विश्वास आहे कि आपण या कामात नक्किच यशस्वी होऊ.
                             
                                                                           (संतोबा)संतोष गांजुरे.

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!