सारं आहे तोट्यात दाखवून, विका सर्व.
असा हा नवभारत, अन् असे हे विकासपर्व.घोटाळेबाज दल्ले, राजरोस लुबाडती खर्व.
अन् आम्हाला केवळ, वांझोट्या गोष्टींचा गर्व.
दीन दुबळ्यांना झोडपणे, हे असे त्यांचे शौर्य.
अन् अन्यायाविरुद्धचा लढा वाटे त्यांना कौर्य.
जनतेस लावी देशोधडीला, एवढेच त्यांचे कार्य.
कोहळा घेऊन आवळा देणे, हे त्यांचे औदार्य.
साऱ्या घोटाळ्यांचे, गाडीभर पुरावे यांच्या संग्रही.
नोटीशी पाठवून त्यांना, सोबत घेण्या हे आग्रही.
व्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या संकल्पी हे निग्रही.
जे जे त्यांच्या विरोधात, ते सारे देव,धर्म,देशद्रोही.
कुबेरा श्रीमंत करण्या, ठेवती सारं काही गहाण.
काबाडकष्ट करणाऱ्याच्या वाट्यास, येई मरण.
राक्षसी सत्ता, गडगंज संपत्तीपुढे होती सारे शरण.
पडद्या-मैदानावरचे सारे वाघही, घालती लोटांगण.
गतकाळाची ओढ यांना, नको भविष्याची पायाभरणी.
बेजबाबदार सारे, फलद्रूप होईना यांची एकही करणी.
निष्फळता लपविती, गात गतअग्रणीच्या नावे रडगाणी.
कायदे बदलून नितीभ्रष्ट होती पावन, करण्या मनमानी.
संतोबा ....
0 प्रतिक्रिया:
Post a Comment