मी कर्ता, मीच करविता, मी साऱ्यांचा भाग्यविधाता.आसमानी,सुलतानी संकटी, मी संकटमोचक विघ्नहर्ता.कष्टकऱ्यांचा नेता मी, भांडवलदारांचा सारथी मी.सर्वांच्या यशातील वाटा मी, असा आहे मी असामी.चेहरा माझा पुरोगामी, प्रतिगाम्यांचाही आधार मी.दोन्ही दगडी पाय माझा, पडद्यामागचा सुत्रधार मी.अगम्य माझ्या चाली अन् लवचिक माझी विचारधारा.दोन्हीकडे ऊठबस माझी. संकटी जो मी त्याच्या आधारा.अकल्पित माझ्या भूमिका, कधी कोणाला देतो टाळी.घडो काहीही कुठेही, साऱ्यांना वाटे माझीच ही खेळी.आपले साऱ्यांशीच सख्य, नाही कोणाशी कसले वैर.न बोलल्या शब्दांबाहेर जो माझ्या, नाही त्याची खैर.सत्तेच्या सारीपाटापायी, अलत्याभलत्यांशी लावतो पाट.वेळोवेळी, भल्याभल्यांना दाखवतो मी कात्रजचा घाट.रुजवली मी जी विषवल्ली, भिडे तिचा फास माझ्या गळा.उद्ध्वस्त केली तरुणाई तिने, मनी फुलवला द्वेषाचा मळा.निकराच्या लढाईत, डाव जिंकताना तह मी केला.बेरजेच्या राजकारणात, विश्वास मात्र वजा झाला.कमावला नावलौकिक, तरी पाठ सोडेना खंजीर.वैऱ्यास सामील झाले सांगाती, तोडून नात्यांची जंजीर.संतोबा...
Sunday, June 22, 2025
आधारवड
Saturday, June 14, 2025
जागृती
मत आमचे, ईव्हीएम तुमची.
देश आमचा, सत्ता तुमची.
राज्य आमचं, राजकारण तुमचं.
दरबार आमचा, कारभार तुमचा.
निष्ठा आमची, प्रतिष्ठा तुमची.
देश आमचा, सत्ता तुमची.
राज्य आमचं, राजकारण तुमचं.
दरबार आमचा, कारभार तुमचा.
निष्ठा आमची, प्रतिष्ठा तुमची.
सातबारा आमचा, शिक्का तुमचा.
पिकं आमची, दर तुमचा.
कष्ट आमचे, कर तुमचा.
फास आम्हाला, घास तुम्हाला.
उपाशी आम्ही, तुपाशी तुम्ही.
उपाशी आम्ही, तुपाशी तुम्ही.
योजना आमच्या, लालफित तुमची.
हतबल आम्ही, बलवान तुम्ही.
अस्वस्थ आम्ही, आश्वस्त तुम्ही.
हाल आमचे, व्यवस्था तुमची.
खड्डेखुड्डे आम्हाला, पायघड्या तुम्हाला.
हतबल आम्ही, बलवान तुम्ही.
अस्वस्थ आम्ही, आश्वस्त तुम्ही.
हाल आमचे, व्यवस्था तुमची.
खड्डेखुड्डे आम्हाला, पायघड्या तुम्हाला.
धर्म आमचा, बंधने तुमची.
सेवा आमची, मेवा तुमचा.
श्रद्धा आमची, धंदा तुमचा.
तिजोरी आमची, किल्ली तुमची.
घाव आम्हाला, भाव तुम्हाला.
जुलमी राजवट, निर्दयी व्यवस्था तुमची.
ती उद्ध्वस्त करण्याची ताकद आमची.
देव,देश,धर्माच्या बाजारीकरणाचे हस्तक तुम्ही.
तथ्य जाणून सत्यशोधन करणारे मस्तक आम्ही.
क्षणभंगुर वर्चस्ववाद तुमचा, शाश्वत समता आमची.
संतोबा...
Subscribe to:
Posts (Atom)