Ads 468x60px

Monday, September 9, 2013

बलात्कार ख्ररेच थांबावेत ?????

    दररोज बलात्काराच्या बातम्या आणि त्या संदर्भातील प्रतिक्रिया ऐकून आम्ही व्यथित होत होतो. परंतू आमची व्यथा कशी व्यक्त करावी या विवंचनेत कित्येक दिवस आम्ही अस्वस्थ होतो. कारण आम्हीसुध्दा काही धुतलेल्या तांदळासारखे नाही आहोत. आमच्याकडूनही काही वेळा मानसिक व्यभिचार होतो त्यामुळे या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार आपल्याला आहे की नाही हा प्रश्न पडला होता. खूप विचारांती आम्ही या निष्कर्षाप्रत आलो कीआमचा हा मानसिक व्याभिचार म्हणजे कधी अप्रतिम सौंदर्याला दिलेली दाद होती, तर कधी पुरुषत्वाने घातलेली साद होती. आणि या सर्व गोष्टी मनातल्या मनात होत्या त्याचा त्रास कोणाला ही झाला नाही, म्हणजे याबाबत वाद असण्याचे काही कारण नाही. दुसरे असे की मानसिक व्याभिचार न केलेली व्यक्ती या पृथ्वीतलावर सापडणे केवळ अशक्य. आमच्या कित्येक मित्रांनी प्रेमविवाह केला आहे, पण तरीसुध्दा त्यांची वासुगिरी,लाळ घोटेपणाला काही मर्यादा नाही याच गोष्टीवरुन कित्येकदा आमचे वाद झाले आहेत. त्यामुळे त्यामानाने निश्चितच आम्ही कितीतरी सज्जन आहोत. असो तर विषयाला सुरूवात करूया....
      राजधानीतील अमानुष सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर अशा प्रकरणांचे पीकच आले आहे असे वाट्तेय.त्याबरोबरच वाटेल त्या विक्षिप्त प्रतिक्रिया देण्याचेही पीक भलतेच फोफावले आहे. आमच्या दृष्टिकोनातून बलात्कार ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. कोणी ठरवून किवा कट रचून करत असतील असे मला वाटत नाही, पण काही वेळेस बदला घेण्याचा किवा इतरही काही उद्देशाने ठरवून किवा कट रचून करत असतील याचीही शक्यता नाकारता येत नाही. कोणी पीड़ित मुलीलाच जबाबदार धरत आहेत कोणी समाजव्यवस्थेला. कोणी क़ायदा बदलण्याची भाषा करतोय तर कोणी आरोपीला काय शिक्षा द्यायची याची भाषा करतोय. मीडीयावालेही या वाहयात प्रतिक्रियांना भलतीच प्रसिद्धि आणी मह्त्व देत आहे व आपण ही चवीने त्या बातम्या वाहिन्याना हवाहवा असलेला टी. आर. पी वाढण्यास मदतच करत आहोत.
      बलात्कार हा आपल्या मानवजातीवरील सर्वात घाणेरडा कलंक आहे व तो दूर करणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे हे जाणून ह्या संकटामधून सर्वांच्या सहभागतून एखादा सुवर्णमध्य काढायचा सोडून एकमेकांना वाहयात सल्ले देण्याची चढाओढच लागली आहे. उदाहरणादाखल..
      पीडिताने जर बलात्काराचा आनंद लुटला असेल तर, अशा गुन्ह्यासाठी देहदंडाविषयी शिक्षा देताना दोनदा विचार करावा- एक न्यायाधीश
      आरोपींबरोबरच पीडित तरुणीसुद्धा तेवढीच जबाबदार."टाळी एका हाताने वाजत नाही, दोन्ही हातांनी वाजते", तिने आरोपींना भाऊ, दादा संबोधून आपला जीव व इज्जत वाचवायला हवी होती"-स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु.
"बलात्काराच्या घटना घडायला नको असतील तर बालविवाह केले जायला हवेत" - माजी मुख्यमंत्री
      क्षुल्लक प्रसिध्दीपोटी टिचभर कपडे घालून उत्तान दृश्‍ये, अश्लील अंगविक्षेप करणार्‍या मॉडेल्सनी बलात्कराला आम्ही जबाबदार नाही,ते तर आमच्या जन्माच्या आधीही व्हायचे. बलात्कार्यांना फाशी द्यावी, त्यांचे लिंग कापून टाकावे अशा प्रकारची वक्तव्य केली.त्यांच्या प्रतिक्रिया देण्यात पिडितेबद्दलच्या आत्मियतेपेक्षा प्रसिध्दीची हाव जास्त होती.
      काय कारणे असू शकतील बलात्काराला निव्वळ विकृती,पुरुषी अहंकार,स्त्रीयांबद्दलची तुच्छता,पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव, फॅशनेबल,आखूड कपडे, भडक मेकअप, लिंगगुणोत्तरातील तफावत,सार्वजनिक ठिकाणी चाललेले अश्लील चाळे, आर्थिक,सामाजिक परिस्थितीमुळेचा अविवाहितपणा, मागणी तसा पुरवठा नाही झाला तर बंड हे होणारच. ही सगळीच कारणे गृहीतधरून काही गोष्टीवर आपण स्वत:च निर्बंध घातले तर एक जबाबदार समाज म्हणून या पापातून थोडी का होईना मुक्ती होईल.
      आखूड आणि तंग कपडे घालणे ही फक्त फॅशनच नाही तर मॉडर्नपणा दाखविण्याची गरज अर्थात स्टेटस सिम्बॉल बनले आहे. बराचसा वादही यावरूनच आहे, ही एक अशी गोष्ट आहे त्यामुळे मुले बलात्कारास प्रवृत्त होतात असा खूप जणांचा आक्षेप आहे, पण ह्या नराधामांच्या वासनेस ६ महिन्याच्या मुलीपासून ६० वर्षाच्या वृद्धेपर्यंत कोणीही बळी पडत असते. कमीत कमी १३ वर्षापर्यंतच्या मुलीकडे पाहून बलात्कारास प्रवृत्त होणे ही विकृती नाही का? त्या ६ महिन्याच्या, ६ वर्षाच्या मुलीने काय गुन्हा केलाय तिने काय तंग कपडे घातले होते, का तिने त्याला दादा म्हणायला पाहिजे होते म्हणजे त्याने तिला सोडून दिले असते? एवढ्या लहान मुलीकडे पाहून जर कोणी उत्तेजित होत असेल तर त्याने तात्काळ मानसोपचार तज्ञांची भेट घेऊन पुढे होणारा अनर्थ टाळावा हे उत्तम.मुलींनीही समाजात वावरताना जबाबदारीने वागलेले उत्तम, तुमचे आखूड कपडे, भडक मेकअप, तथाकथित बॉयफ्रेंड बरोबरचे चाळे करून सुध्दा तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या सुरक्षितपणामुळे तुम्ही बलात्कारास बळी पडत नसाल पण तुम्हाला पाहून एखादा पेटलेला नराधम एखाद्या लहान,असहाय मुलीवर बलात्कार करायला प्रवृत्त होत नसेल कशावरून? निश्‍चितच प्रत्येकाने सुंदर दिसण्याचा प्रयत्‍न करणे यात काहीच गैर नाही, चारचौघात आपण उठून दिसत असू तर आपला आत्मविश्वास आपोआपच द्विगुणित होतो यात शंका नाही पण मेकअप करताना तो सौंदर्य खुलविण्यासाठी करतोय खुणविण्यासाठी नाही हे लक्षात ठेवावे.
      बलात्कार करून खून, सामूहिक बलात्कार अशा प्रकरणात द्रुतगती न्यायालये स्थापन करावीत एक ते तीन महिन्यात अंतिम निकाल द्यावा. गुन्हा सिध्द झाल्यास अशा गुन्हेगारांस शक्यतो फाशीची शिक्षा तीही तात्काळ देण्यात यावी. पण जिथे एकाच व्यक्ती कडून बलात्कार केला जातो तिथे मात्र असे करणे उचित होणार नाही, त्या प्रकरणात काही वेगळे पैलू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीसुध्दा व्यवस्थित गुन्हा शाबित झाला तर त्याला जन्मठेप देण्यात यावी. इतर गुन्ह्यात शिक्षा देताना गुन्हेगार एकापेक्षा जास्त असतील तर त्यांच्या शिक्षेत भागाकार होत असेल पण सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात शिक्षा देताना गुणाकार करावा.
      ज्या घरात स्रीयांचा आदर सत्कार होत नसेल त्या घरात सुख-समाधान कधीच लाभू शकणार नाही, एक लक्षात ठेवा तुमची बायको,आई,बहीण खुष असेल तरच तुम्ही खुष राहू शकाल पण त्यांचा छळ करूनही तुम्ही सुखी राहू शकत असाल तर मग आपण माणूस म्हणवून घ्यायच्या लायकीचे नाही आहोत हे लक्षात ठेवा. मुलगा-मुलगी भेद करू नका, मुलीच्या जन्माचीही तेवढ्याच आतुरतेने वाट पहा. शेवटी ती आहे म्हणून तो आहे आणि तो आहे म्हणून ती दोघेही एकमेकाशिवाय अपूर्णच मग भेदभाव कशाला. चला मानसिकता बदलूया, देश बदलूया एक नवीन सुसंस्कृत भारत घडवूया..

               --संतोष गांजुरे.

माझ्या मनीचा राजकुमार !!!

   माझ्या इतकी सुंदर तरुणी मी अद्याप पाहिलेली नाही, तरी त्यावेळेसची गोष्ट काही औरच होती पहिल्यांदा नव्या ऑफीसमध्ये पाऊल टाकताच सर्वांच्या नजरा माझ्यावरच खिळल्या आहेत याची मला जाणीव झाली, अर्थात ही बाब माझ्यासाठी काही नवीन नव्हती. शाळा,कॉलेज,कॉलनीच कुठेही असू दे असाच अनुभव. काही वेळा ते आवडायचे सुध्दा पण बर्‍याचदा त्या विखारी, वासनांध नजरा पाठी टोचत राहायच्या. माझ्या येण्याने सर्वांना जो अवर्णनीय आनंद झाला होता तो लपता लपत नव्हता.
                यथावकाश तास-दोन तासांत वातावरण पूर्ववत झाले, आम्हां सर्वांचे दुपारचे जेवण झाल्यावर पुन्हा कामास सुरूवात केली. सर्व आपआपल्या कामात मग्न होते ते नाइलाजानेच म्हणा. तेवढ्यात एक जण आत आला तो आल्याबरोबर सर्व वातावरणच बदलून गेले सकाळी मी आले त्यावेळी ते ठीक होते पण एक नेहमीचा येणारा तरुण त्याला पाहून सर्वानी एवढे खुष व्हावे याचे मला आश्यर्य वाटले, त्याही पेक्षा जास्त आश्चर्य त्याने सर्वांशी हाय-हॅलो केले पण माझ्याकडे एक साधा कटाक्षही नाही टाकल्यामुळे झाले हे मला अपेक्षितही नव्हते अन् मान्यही नव्हते.  एखाद्या तरुणाने माझ्याकडे दुर्लक्ष करावे ही बाब मला खटकलीच.
                असेच दोन-तीन दिवस गेले पण आमच्या दोघात काही बोलणे झालेच नाही, एका दिवशी रिपोर्ट्स तयार करताना मला त्यात मला काही अडचण आली म्हणून त्याला ती विचारली. तो कसा प्रतिसाद देतोय याची थोडी भिती वाटली पण नाईलाज होता त्यावेळी दुसरे कोणीच जवळ नव्हते. पण माझा अंदाज चुकला, त्याने त्याचे हातातील काम बाजूला ठेवले व मंदस्मित करत, नजरेला नजर भिडवत समजावुन सांगू लागला. माझ्या तर काळजाचा ठोका चुकला. त्याच्या डोळ्यात,बोलण्यात काही तरी जादू नक्की होती. आता मला त्याचे वेगळेपण जाणवू लागले.प्रत्येक मुलगा स्वत:ला डॅशिंग,डायनामिक,हॅंडसम समजत असतो पण त्याला पाहून खरोखर मला तो तसा आहे असे वाटले. त्याचे एका शब्दात वर्णन करायचे तर राजबिंडा असेच करता येईल. त्याचा आचार-विचारच नव्हे तर इतरांकडून होणारा त्याचा प्रचार सुध्दा त्याचे राजेशाहीपण अधोरेखित करत होते ते उगीच नाही.
                आता मात्र तो माझ्याशी दिलखुलास बोलू लागला. मलाही त्याच्याशी बोलणे आवडू लागले. आतापर्यंत प्रत्येक जण माझ्याशी बोलण्याचा,हाय-हॅलो करण्याचा प्रयत्‍न करत पण पहिल्यांदाच मला दुसर्‍या कोणाशी स्वत:हून बोलावासे वाटत होते, तो आल्याबरोबर  आता माझ्या चेहऱ्यावर स्मित उमटू लागले. प्रत्येक दिवशी आमची जवळीक वाढत होती. आणि न राहवून एकेदिवशी मी तो आल्यावर शेकहॅण्ड केले अर्थात ही गोष्ट कोणाच्याच नजरेतून सुटली नव्हती. पुरुषाच्या स्पर्शात काय जादू असु शकते याचा पहिल्यांदाच मी अनुभव घेत होते. क्षणात माझ्या सर्वांगावर सरसरुन रोमांच उभे राहीले.त्याच्या हातात माझा दिल्यावर किती आश्वस्त वाटत होते. आजपर्यंत कित्येकांनी माझ्याशी सहेतुक शेकहॅण्ड वा स्पर्श केला होता पण असे कधीच झाले नव्हते उलट काही वेळा झुरळ अंगावर पडल्यावर जशी शिसारी येते तशी माझी अवस्था व्हायची.
                दिवसेंदिवस मी त्याच्याकडे आकर्षित होतेय याची त्याला जाणीव नसेल अशी शक्यता नव्हती. पण एका मर्यादेबाहेर जाण्याचा वाहयातपणा त्याने कधी केला नाही. त्याने मला प्रपोज केले असते तर मी होकार दिलाच असता असे नाही, पण त्याने मला प्रपोज करावे असे नेहमी वाटायचे. त्याच्या मिठीत बेधुंद विसावावे असे वाटायचे. मनी वसे ते स्वप्‍नी दिसे या उक्तीप्रमाणे सतत त्याचा विचार केल्यामुळे तो नेहमी माझ्या स्वप्नात यायचा, पण स्वप्नातसुध्दा त्याने मर्यादा सोडली नाही मी मात्र बेशलाक त्याचा मिठीत बेधुंद विसावयाची. पण प्रत्यक्षात हा योग कधीच जुळून नाही आला. 
                आज मी दोन मुलांची आई आहे आणि आजही तो माझ्या मनात आहे, कधी तो माझ्या स्वप्नातही येतो पण तो अजूनही तसाच आहे पण मला मात्र का कोणास ठाऊक माझी दोन्ही मुले हुबेहुब अगदी त्याच्यासारखीच आहेत असे नेहमी वाटत राहते.

Sunday, July 21, 2013

मी एक राजपुत्र.......

                मित्रा, मी इतक्या दूरवरून फक्त तुझ्या यशाबद्दल अभिनंदन करण्यासाठी आलो होतो. पण तुला तुझ्या यशापेक्षा माझ्या क्षणभंगूर अपयशाचा एवढा आनंद व्हावा याचे मला आश्चर्य वाटतेय? आणि मी अपयशी झालोय हे फक्त तुम्हाला वाटतेय, तुला माझी आणि मला तुझी काय स्वप्ने आहेत ती माहीत नाहीत का?. माझी स्वप्ने चार-चौघांसारखी नाहीत, खरेतर माझे स्वप्न एक वेडेपणाच आहे पण अजूनही मी त्या वेडेपणाला चिकटून बसलो आहे. तू मात्र तुझ्या स्वप्नांत गरजेप्रमाणे हवा तसा फेरफार करून जिंकल्याचा जल्लोष करतोय, अर्थात त्याबद्दल माझी काहीच तक्रार नाहिये, फक्त काही करून तू खुष असावे एवढीच प्रामाणिक इच्छा आहे. दु:ख याचेच वाटते की, तू माझा जिवलग मित्र आहेच शिवाय तुला माझे ध्येय व त्यासाठीचे माझे प्रयत्न त्याग याची पूर्ण जाणीव आहे तरीसुध्दा तू मला दोष देत आहेस. पण कधी-कधी असेही वाटते की मला एवढ्या भरभरून संधी मिळत असताना देखील मी माझ्या ध्येयाला चिकटून आहे म्हणून तर तुम्हा सर्वांचा जळफळाट होत नाहीये ना?.

                चांगली नोकरी,सुंदर बायको, टू बीएचके फ्लॅट एवढी सामान्य स्वप्ने दोघांचीही नव्हतीच. याचा अर्थ या गोष्टी आपल्याला नको होत्या अशातला भाग नाहीये, तू त्या मोठ्या कष्टाने,स्वकर्तुत्वाने मिळवल्यात त्याचा मला खरेच खूप अभिमान आहे, पण आपली ध्येय गुंडाळून त्या पूर्ण कराव्यात असे मला वाटत नव्हते. मलाही या गोष्टी आज ना उद्या मिळतील मला कसलीच घाई नाहिये. कारण त्या मिळणारच आहेत,त्याबरोबरच मला ध्येयही गाठता येईल याची मला पूर्ण खात्री आहे म्हणून. पण मी त्या दृष्टीने काहीच हालचाल वा प्रयत्न करत नाही ह्या आरोपाशी मी बिल्कुल सहमत नाहीये, उलट ही एक कठोर तपश्चर्या आहे. कारण मी एक भोगी व्यक्ती आहे, तसेच बरेच काही उपभोगण्यासाठी सहजासहजी उपलब्ध असतानाही एखाद्या योग्याप्रमाणे सर्वाचा त्याग केला आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. हा माझा बचाव नाहीये. हे माझे स्पष्टीकरण फक्त सध्या व पुढे काही गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून आहेत बाकी काही नाही. एखाद्याने मला चांगले म्हणावे म्हणून काही करण्याची मला गरज नाहीये.  मी कसा आहे ते मला चांगले माहीत आहे त्यासाठी कोणाच्या कसल्याही प्रमाणपत्राची मला गरज नाहीये.
                शेवटी एकच सांगतो तुम्ही कोणीही असा, पण मी एक राजपुत्र आहे हे लक्षात ठेवा आणि एका राजपुत्राचे असते तेच माझे स्वप्न आहे त्यापासून मी तसूभरही ढळणार नाही भले त्याबदल्यात मला कसलीही किंमत मोजावी लागली तरी बेहत्तर. "वर्षा" हेच एकमेव ध्येय,स्वप्न सर्व काही आहे माझ्यासाठी आणि मी ते प्राप्त करणारच ते सुद्धा स्वकर्तुत्वावर आणि नीतिमत्तेने. ज्यादिवशी मी हक्काने, मानाने वर्षावर जाईल त्यावेळेस तुम्ही माझ्यासोबत असल्यास मला आनंदच होईल. तुम्ही माझ्याशी कसेही वागलात तरी तुमच्याबद्दल माझ्या मनात कसलाही आकस असणार नाही. पण एक त्यादिवशी तुम्ही सर्वांनी माझे राजेपण खुल्यादिलाने मान्य करायचे आणि ते आपण धुमधडाक्यात साजरे करू!!!!
               
  

Wednesday, July 17, 2013

काल मला देव भेटला....

              काल मला देव भेटला,म्हणजे देव काही माझ्यापासून वेगळा नाहीये पण आजकाल मला माझ्याशीच बोलण्यासाठी  वेळ  नाही  तर  काम  नसताना  देवाशी  कशाला  बोलू  उगाचच. काल देव  स्वत:हून माझ्याकडे आलाय  हे  पाहून  विशेष  असे  काही  नाही  वाटले.  देव  कसल्यातरी  चिंतेतच होता त्या चिंतेमुळे देवाची तेज:पुंजप्रभा झाकोळली होती. देवालाही स्वत:चे मन मोकळे करावेसे वाटत असेल नापण त्यासाठी एवढे देवाचे निस्सीम भक्त असताना माझ्याकडे कशाला हा प्रश्न  मला पडला म्हणून त्याला पहिला  प्रश्न तोच विचारला तर देव म्हणतो कसा जे आस्तिक आहेत ते त्यांचीच गाऱ्हाणी गाणार,नास्तिक असणाऱ्यांना तर माझा विटाळ होतो म्हणून तुझ्याकडे आलोय.
      मी म्हणालो पण देवा मी तर  नास्तिक आहे सर्वांना माहित्ये. तू काय माझ्यापेक्षा वेगळा आहेस काया देवाच्या उत्तराने मात्र मी आश्चर्यचकित झालोदेवाला म्हणालो अरे मी घरातून बाहेर पडताना आई नेहमी म्हणते "देवाच्या पाया पड" तर मी असेच म्हणतो देव काय माझ्यापेक्षा वेगळा आहे का?
     पण देवा तू एवढा चिंताक्रांत का आहेसतुझ्या भक्तांवर एकामागून एक येणार्‍या संकटांनी तू हैराण झाला आहेस कातू काहीच करू शकत नाही,का ही तुझीच करणी आहेलोकांनी तुझ्यावर कसा विश्वास ठेवावा तरीही ठेवतातच कितीही काहीही झाले तरीपण मग   घरादारावर तुळशीपत्र ठेऊन तुझ्या दर्शनासाठी, मोक्ष प्राप्तीसाठी  कशाचीही पर्वा न करता कुठे-कुठे यात्रा करतात आणि तू तुला भेटायला आलेल्याच भक्तांना सरळ मुक्तीच देतो आणि तीही इतकी निर्दयीपणे कधी गाड्यांच्या अपघातात तर कधी निसर्गाच्या प्रकोपात. असे का?
           देव थोडासा गंभीर होत म्हणालाजे स्वत:च हरवले आहेत ते मला काय शोधणार ? . ह्याच लोकांनी मला वेगवेगळ्या मंदिरात बंदिस्त केले आहे ना!! अगदी ह्यांच्या सोईनुसार माझ्या विश्रांतीची वेळ ठरते. घुसमट होते रे माझी. मला वाटले मी माणूस बनवून एक अतिशय सुंदर आणि सृजनशील गोष्ट जन्मास घातली आहे. मुलगा तरुण झाल्यावर बापाला आराम मिळेल अशी अपेक्षा असते,त्याप्रमाणे मला ही वाटले आता मलाही विश्रांती मिळेल पण माझा अपेक्षाभंगच झालाय. यांच्या अपेक्षा ऐकून घ्यायलाच मला वेळ मिळत नाहीमग पूर्ण कधी करणारआणि का म्हणून करायच्याकाय दिले नाही मीकशात चुकलोय हेच मला  कळत नाहिये?मी चराचरात सामावलेला असताना मुळात त्या पवित्र तिर्थक्षेत्राच्या नावाखाली मला एका ठिकाणी बंदिस्त केले आहे. मला शक्य होईल एवढ्या सर्व शक्ती मी मानवाला प्रधान केल्या आहेत.लाख मोलाची बुध्दिमत्ता दिली असताना निर्लज्जपणे कवडीमोल लाचेचे लालूच देऊन मला भ्रष्ट करण्याचा निरर्थक प्रयत्न करत आहेत. वाटले मनुष्य आपल्या बुध्दी सामर्थ्याच्या जोरावर इतर सजीवांना सोबत विश्वाचा रहाटगाडा हाकेल पण त्याला स्वत:लाच न्याय देता आला नाही तर त्या मुक्या जीवांना काय देणार?
      देव उद्विग्नपणे असे बरेच काही बोलत होता एकूणच काय देवपणाचे ओझे पेलवणे देवाला जरा
जडच जात होते.शेवटी मीच देवाला वचन दिलेमी आजपर्यंत तुझ्याकडे काही मागितले नाही आणि यापुढेही काही मागणार नाही पण अधून-मधून भेटत जाईल. एवढे सुंदर विश्व बनवल्याबद्दलतसेच मी काही न मागताच मला सर्व काही दिल्याबद्दल आभार मानण्यासाठी!!!!!!!!                जाता जाता देव  मला  म्हणाला  अधे-मध्ये चुका करत जा एखादे वाईट काम ही करत जा नाहीतर हे लोक  तुलासुद्धा एक दिवस देव बनवतील.

Sunday, June 23, 2013

एक पत्र राजसाहेबांना….

       राजसाहेब आपली वक्तृत्वशैली असो वा जीवनशैली त्याचे प्रचंड आकर्षण आजच्या तरुणाईला आहे, तर इतराना कौतूक.मग तो विरोधी पक्षातील असो वा अमराठी!!! अर्थात आम्हीही त्यास अपवाद नाही आहोत. पण ते वैचारिक साम्यतेमुळे. साहेब कोणत्याविषयावर काय बोलतील, कोणावर टीका करतील,कोणाचे कौतूक करतील याचे अचूक अंदाज आम्ही बांधत असू, ते इतके अचूक असत की काही मित्रांना मी भाषणे लिहून देतो की काय अशी शंका येत. पण आता साहेबांची मोहिनी ओसरत चालली आहे, आमचे अंदाज ही चुकू लागलेत. जसा पक्षाचा विकास वेगाने झाला तशाच लोकांच्या अपेक्षाही वाढल्या पण त्यांचा भ्रमनिरासच झाला.
       समर्थकांसह विरोधकांचेही लक्ष नाशिकवर केंद्रित झालेय. होणारच कारण नाशिक शहरात आपले तीन आमदार आहेत ज्यांचा कालावधी संपत आलाय, महापालिकेत सत्ता आहे. पण विकासाची कुठे सुरूवात आहे असे दिसत नाही. लोकांचा भ्रमनिरास होतोय आणि याची आपणास निश्चित जाणीव आहे. वेळोवेळी पुरेसा कालावधी पुर्ण झाला नाही, पूर्ण सत्ता नाही अशी कारणे आपण देत आहात. नाशिक शहरात आपले तीन आमदार आहेत ज्यांचा कालावधी संपत असतानामहापालिकेत सत्ता असताना आपण अशी कारणे देणे शोभत नाही. सत्तेत असल्याशिवाय कामे होत नाही हे पटत नाहीत कारण विरोधी पक्षातीलही काही आमदार-खासदार आहेत जे सत्तेत नसताना जोमाने काम करत आहेत मग इतराना का अडचण यावी. आपण एक-दोन वर्ष पाळणा नाही हलला तर अनेक शंका घ्यायला. अनाहूत सल्ले द्यायला सुरूवात करतो. मग एक वर्षानंतर काही कामांची अपेक्षा करणे निरर्थक नक्कीच नाही. लोकांसाठी स्वत:ची संस्कृती,अस्मिता टिकवण्याबरोबरच विकासही महत्वाचा आहे. बायको नुसती सुंदर असून चालत नाही तिला मुलंही व्हायला हवीत ना?
       मोदींनी ठेका दिल्याप्रमाणे गुजरातेतून जशा विकासाच्या बातम्या येतात तशाच बातम्या नाशिकमधून येतील अशी आमची भोळी अशा होती, होती अशासाठी की आता वर्ष उलटून गेले पण तिकडे विशेष काही होतेय याची जराशीही कुणकुण लागत नाहीये. गुजरातेत काय,किती आणि खरच विकास झालाय हे आम्ही थोडेच पाहिलय? पण सगळेच उदोउदो करतायेत आणि आपण स्वत: गुजरातचा विकास पाहून आला आहात आणि तोंडभरून स्तुतीही केले आहे म्हणजे नक्कीच विकास होतोय असे मानायला हरकत नाही. पण आपल्या नाशिकमधून,महाराष्ट्रातून अशा बातम्या कधी येणार?
       आमच्या पुरंदरमध्ये विजयबापू शिवतारे या शिवसेनेच्या वाघाने , नजरेत भरेल असा कामे करण्याचा सपाटा लावला आहे, ते ही विरोधी पक्षातच आहेत आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात!! त्यांची कामे बघून बारामतीकराना घाम फुटलाय म्हणे. निवडणुकीच्यावेळी आमच्या मातोश्रींनी कोणाला मत देऊ असे विचारले तर आम्ही रेल्वे इंजिनवर शिक्का मार म्हणालो माझा पक्ष आहे. शेजारी-पाजारी, सगेसोयरे म्हणाले घड्याळावर शिक्का मार आपला पाहुणा आहे. आईने बेधडक धनुष्यबाणावर शिक्का मारला. तोपर्यंत धनुष्यबाणाचा पुरंदरशी संबंध फक्त अनामत रक्कम जप्त होण्याइतपतच होता यावेळी इतरांची अनामत रक्कम जप्त झाली!! आज आम्हाला आमच्या मातोश्रींचा अभिमान वाटतोय. ती अशिक्षित आहे पण अडाणी नाही.त्यामुळे आपल्याकडे सत्ता नाही, पुरेसा कालावधी मिळाला नाही, अशी कारणे आपल्यासारख्या डॅशिंग नेत्याकडून अपेक्षित नाहीत.
       आता विधानसभा निवडणूका जवळच आल्यात काही दिवसात आपण सभा घ्यायला सुरवात कराल. पण खरे सांगतो साहेब सभा ऐकण्याची ती ओढ शिल्लक नाही राहिली. मान्य आहे बरेचशे वैचारिक दिवाळखोर नेते आहेत त्यांच्यावर आपण टीका-टिप्पणी करता त्यांची खिल्ली उडवता नक्कल करता. आम्ही ते शेकडो वेळा पाहिलेय पुन्हा पुन्हा, पण आता ते पाहून आम्हाला हसू येत नाही. त्या नेत्यानी सुद्धा आपले अस्तित्व टिकवण्यासाठी काही ना काही कामे केलीत, काही तजवीज केलीये. याउलट आपल्या नेत्यांची- कार्यकर्त्यांची नावे खंडणी वसुली,खून,मारामारी, बलात्कार अशा अनेक गुन्हेगारी खटल्यात येतायेत. आणि आपण सभामधून एकहाती सत्तेची मागणी करताय. जनतेच राहू दे बाजूला पण कार्यकर्त्यांचे काय त्यांना अपेक्षित उर्जा मिळालीच नाही कसे काम करणार ते. सत्तेची पहिली पायरी म्हणून नाशिक कडून काही अपेक्षा होत्या पण सर्वांच्या पदरी निराशाच पडलीये. आपल्या टीकेचा, कारणांचा आम्हाला उबग आला आहे.
       त्यामुळे उद्या कोणीही एखादा टग्या उठून साहेबांना रड्या म्हणेन , आम्हाला ते बिल्कूल आवडणार नाही पण त्याचा विरोध तरी आम्ही कसा करायचा?.....


Saturday, June 22, 2013

साहेब

                आमचे स्वप्न काय हे ऐकून बर्याच जणांसाठी तो चेष्टेचा विषय बनतो,कारण ते आहेच तसे स्वप्नवत
आम्हाला आमची कोणतीही गोष्ठ सर्वसामन्य असलेली आवडत नाही मग आमचे स्वप्न तरी सामान्य कसे असेल?याच स्वप्नापायी आम्हाला मुंबईची अनामिक ओढ लागली अगदी आमचे पहिले प्रेम म्हणजे मुंबई!!!
                आज २० नोव्हेंबर २०१२ ला आम्हाला मुंबईत पाउल ठेऊन  वर्षे झालीपण खरे सांगायचे तर या सहा 
वर्षात आम्हांस खास असे काही करता आले नाहीप्रयत्न केले पण अपेक्षित यश कधीच लाभले नाहीत्याची कधी आम्ही पर्वा केली नाही कारण आमचे स्वप्न पूर्ण होणे किती खडतर आहे आणि त्याला किती कालावधी लागेल 
याची आम्हांस पूर्ण जाणीव आहेपण मुंबईत आल्यानंतर एक ना एक दिवस आमची बाळासाहेबांसोबत भेट   होईल अशी आशा नव्हे खात्रीच होते पण हा योग जुळून येण्याआधीच परवा साहेबांनी हे जग सोडलेआम्ही   निश्चितच आमच्या प्रयत्नात कमी पडलो आणि साहेबांचा आशिर्वाद नाही लाभला याची आम्हांस आता खंत  वाटते आहे पण नशिबानेच निदान अंत्ययात्रेत का होईना डोळेभरून साहेबांचे अंतिम दर्शन झाले हाच आशीर्वाद समजून   आम्ही आमचे पुढील प्रयत्न चालू ठेऊ.
    आम्ही नक्की काय प्रयत्न केले हा सर्वाना प्रश्न पडला असेल पण याचे उत्तर माझे स्वप्न पूर्ण झाल्यानंतरच भेटेल आणि त्यावेळीच त्याला काही तरी अर्थ प्राप्त झाला असेलदुर्दैवाने यासाठी आपणांस आणखी काही दशके वाट  पहावी लागेल.....


Saturday, June 15, 2013

मी आणि माझी अहंकारीक वचने --- ५

आयुष्यभर अपराधीपणाचे ओझे वाहण्यापेक्षा अपराध छोटा असो वा मोठा तो तत्काळ मान्य करणे केव्हाही श्रेयस्कर!!!
***********************************************************************
माझा तुमच्या देवावर विश्वास नाहीये, मी असा दगड शोधतोय ज्यावर मला डोळे झाकून विश्वास ठेवता येईल. भले माझ्या यशानंतर तुम्ही त्याचा देव केला तरी चालेल!!!!!!!!!!!!!
************************************************************************
जगासाठी आपण चांगले असणे ही आपल्या स्वत:साठी सर्वात वाईट गोष्ट आहे.
************************************************************************
ज्यांनी आपल्या ध्येयाशी तडजोड केली आहे ते सर्वजण त्यांच्याच नव्हे तर जगाच्या दृष्टीनेही यशस्वीच आहेत....
************************************************************************
सर्व गोष्टी जर माझ्या मनासारख्या झाल्या असत्या तर आज मी काहीच करू शकलो नसतो
************************************************************************
विवाहित मुलीचे आई-वडिलांप्रती असलेले प्रेम वळवाच्या पावसासारखे असते, वर्षातून एखादेवेळेसच अवचित येणारा वळीव सोसाट्याचा वारा,मेघांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटांसह येऊन आपल्या आगमनाची वर्दी अखंड आसमंताला देत क्षणात धो-धो बरसून नाहीसा होतो, नंतर सारे कसे शांत सुने-सुने........
तर मुलाचे प्रेम म्युनिसिपालीटीच्या पाण्याच्या नळासारखे.... सर्वांची रोजचीच तक्रार असते पण त्याशिवाय जगताही येत नाही...
************************************************************************
 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!