आमचे स्वप्न काय हे ऐकून बर्याच जणांसाठी तो चेष्टेचा विषय बनतो,कारण ते आहेच तसे स्वप्नवत.
आम्हाला आमची कोणतीही गोष्ठ सर्वसामन्य असलेली आवडत नाही मग आमचे स्वप्न तरी सामान्य कसे असेल?याच स्वप्नापायी आम्हाला मुंबईची अनामिक ओढ लागली अगदी आमचे पहिले प्रेम म्हणजे मुंबई!!!
आज २० नोव्हेंबर २०१२ ला आम्हाला मुंबईत पाउल ठेऊन ६ वर्षे झाली. पण खरे सांगायचे तर या सहा
वर्षात आम्हांस खास असे काही करता आले नाही, प्रयत्न केले पण अपेक्षित यश कधीच लाभले नाही. त्याची कधी आम्ही पर्वा केली नाही कारण आमचे स्वप्न पूर्ण होणे किती खडतर आहे आणि त्याला किती कालावधी लागेल
याची आम्हांस पूर्ण जाणीव आहे. पण मुंबईत आल्यानंतर एक ना एक दिवस आमची बाळासाहेबांसोबत भेट होईल अशी आशा नव्हे खात्रीच होते पण हा योग जुळून येण्याआधीच परवा साहेबांनी हे जग सोडले, आम्ही निश्चितच आमच्या प्रयत्नात कमी पडलो आणि साहेबांचा आशिर्वाद नाही लाभला याची आम्हांस आता खंत वाटते आहे पण नशिबानेच निदान अंत्ययात्रेत का होईना डोळेभरून साहेबांचे अंतिम दर्शन झाले हाच आशीर्वाद समजून आम्ही आमचे पुढील प्रयत्न चालू ठेऊ.
आम्ही नक्की काय प्रयत्न केले हा सर्वाना प्रश्न पडला असेल पण याचे उत्तर माझे स्वप्न पूर्ण झाल्यानंतरच भेटेल आणि त्यावेळीच त्याला काही तरी अर्थ प्राप्त झाला असेल. दुर्दैवाने यासाठी आपणांस आणखी काही दशके वाट पहावी लागेल.....
0 प्रतिक्रिया:
Post a Comment