Ads 468x60px

Sunday, February 2, 2014

नाट्यरंग- १) विच्छा माझी पुरी करा


      चित्रपटगृह किंवा नाट्यगृहात जाऊन चित्रपट वा नाटक पाहण्याचा शौक आम्हांस बिल्कुल नाही. मराठी चित्रपट, नाटक चालावीत, जगावीत असे आम्हांस वाटते खूप पण त्यासाठी प्रयत्न काहीच नाही. कोणी अगदी आग्रहाने चल म्हणाले तरी आम्ही जात नाही पण आमचे मित्र संजय मोहिते हे स्व:त कलाकार असल्याने आणि त्यांची मुख्य भूमिका असलेले नाटक असल्याने आम्ही नकार तरी कसा देणार. "विच्छा माझी पुरी करा" या नाटकानेच माझी नाट्यगृहात जाऊन नाटक पाहण्याची नसलेली इच्छा पुरी झाली. नाटक पाहिल्यानंतर नाट्यगृहात जाऊन ते पाहण्यात काय वेगळाच आनंद असतो याची जाणीव झाली त्याचबरोबर उद्‌घाटनाचा प्रयोग असल्याने अनेक नामवंत कलाकारांना प्रत्यक्षात भेटता आले. एक कलाकार म्हणून संजयबद्दल सुरुवातीपासूनच आदर होत आणि ह्या नाटाकाने द्विगुणीत झाला, अर्थात तो फारसा दिसून येत नाही. मी सल्ले देण्यात,मस्ती करण्यात नेहमीच त्याच्या वरचढ असतो अर्थात हा त्याचा मोठेपणा.
            सन्माननीय प्रेक्षक म्हणून चार-सहा प्रयोग मित्रांना फुकटात दाखविताना माझा वांझोटा अभिमान उगीचच उफाळून यायचा. मला सर्व फुकटात असले तरी आता त्या फुकटाची लाज वाटू लागली होती. कारण दोन अडीच तास रंगमंचावर दमदार अभिनयाने मनोरंजनासोबत सामाजिक प्रबोधन करणार्‍या कलाकारांची वैयक्तिक आयुष्यातील फरपट मी जवळून पहात होतो. फुकटात नाटक पाहणे त्या कलाकाराच्या अभिनयाचा अपमानच नव्हे तर माझ्या सामाजिक बांधिलकीशीही प्रतारणा होती. स्टेटस म्हणून तीनशे रुपयाचा शर्ट दीड-दोन हजाराला विकत घेताना काहीच वाटत नाही पण १५०-२०० चे तिकीट काढून नाटक-चित्रपट पाहायला जिवावर येते.
            कित्येक कलाकारांच्या आयुष्याची राखरांगोळी झालेली आपण नेहमी पाहतो.कलाकारांना आपण तारे म्हणतो ते त्यांना शोभण्यासारखेच आहे. रात्री तारे चमकतात तोपर्यंतच त्यांचे अस्तित्व, रात्र संपली की ते अस्तित्वशून्य होतात, आपल्यालाही त्यांची अनुपस्थिती सूर्यप्रकाशात जाणवत नाही. कलाकारांचेही तसेच आहे,  ऐन उमेदीच्या काळात तार्‍याप्रमाणेच समाजाच्या सुख-दुखावर मनोरंजनाची फुंकर घालून हास्य पसरवणार्‍या बर्‍याचशा कलाकारांच्या उत्तरार्धातील आयुष्याची राख पैलतीरी पोहचण्यासाठी कोणाच्यातरी मेहेरबानीची आवश्यकता लागते. अभिनय हा त्यांचा व्यवसाय नसतो त्यांचे वेड असते. प्रत्येक क्षेत्रात असे  ध्येयवेडे असतात अशा वेड्यांचे कर्तुत्व अजरामर होतेच पण जिवंतपणीसुद्धा त्यांचे अस्तित्व तळपत राहायला हवे.
             एका चित्रपटासाठी १०० कोटी घेणार्‍या कालाकारांबद्दल मी बोलत नाही त्यांच्या सहकारी कलाकारांचे मानधन पहा, आपल्या मराठीत तर कलाकारांची जास्तच होरपळ होत असते. "फॉरेनची पाटलीण" या चित्रपटातील पक्या भावोजी या प्रसिद्ध भूमिकेसाठी संजूला अवघे चाळीस हजार मानधन भेटले होते हे एकूण मला आश्चर्याचा दुख:द धक्का बसला होता. कला, संस्कृती टिकवणे हे आपले स्वत:चे अस्तित्व टिकवण्याहून वेगळे नाही. मी आता महिन्या-पंधरा दिवसाला एखादा चित्रपट वा नाटक पाहायचे ठरवले आहे आणि ते ही तिकीट काढून. आणि तुम्ही...

1 प्रतिक्रिया:

Unknown said...

ओह ते पक्या भावोजी म्हणजे संजय मोहिते,,,लेख छान लिहल आहे आणि सामान्य जणांनी नाटक सिनेमे थिएटरमध्ये जाऊन पाहावे या बद्दल जे प्रोत्साहन तुम्ही दिलाय ते एक चांगली गोष्ट आहे, आजकाल घरी बसून मोबाइल वर नविन सिनेमे सहज उपलब्ध होत आहेत यामुळे जे अजूनपर्यंत प्रसिद्ध झालेले कलाकार व दिग्दर्शक आहेत त्यांचं म्हणजे एकूणच त्या पूर्ण टीम च नुकसान होत, तुम्ही सुचवलेली सूचना अमलात आणली तर कलाकारांना अजून उमेद मिळेल आणि मराठी चित्रपट निर्मित करणाऱ्या दिग्दर्शकान ही उत्साह वाटेल

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!