Ads 468x60px

Tuesday, October 2, 2018

मी आणि माझी अहंकारीक वचने - ११

माझी "यशस्वी उद्योगपती व्हा" ही व्याख्यानमाला यशस्वी झाली नसती तर मलाही
 कुठे तरी रोजंदारीच करावी लागली असती.

*********************************************************************************
लाखों रुपयांची बिदागी घेणारे कीर्तनकार, मला "स्टँडअप कॉमेडीयन" पेक्षा वेगळे वाटत नाहीत.

*********************************************************************************
जर माझ्या आयुष्यात शनाया आली तर तू राधिका होशील का?
३०० कोटींची कंपनी हस्तगत करशील का?
#तुझ्या_सवतीचा_नवरा

*********************************************************************************
काही लोक्स आयुष्यभर कष्ट करून मोठं होण्याचा प्रयत्न करतात आणि काही
क्षणभरात लग्न करून मोठे होतात🙂.

*********************************************************************************
विराट एकटाच संपूर्ण संघाच्या अर्धे रन्स काढणार असेल तर
किमान नॉन प्लेइंग कॅप्टन म्हणून अनुष्काला खेळवायला हरकत का असावी???

*********************************************************************************
लग्नपत्रिका, फ्लेक्सवरील तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांची भली मोठी यादी पाहून, 
शेतमजुरांच्या कमतरतेच्या समस्येवर उतारा सापडल्यासारखे वाटतं.

*********************************************************************************
शेलार- चला गणपती बुडवायला.
वाळिंबे-आमच्यात विसर्जन करतात.
(शेलार-वाळिंबे जोरदार वाद)
वाळिंबे- काय रे संतोबा,बरोबर ना! 
संतोबा- दोघेही बरोबर आहात. वाळिंबे प्राणप्रतिष्ठापणा करतात म्हणून विसर्जित करतात, 
शेलार बसवतात म्हणून बुडवतात.

*********************************************************************************
                                                                                       (संतोबा)संतोष गांजुरे.

मी आणि माझी अहंकारीक वचने - १०


तुमचे गैरसमज, रुसवे-फुगवे, मानापमान हे सगळं पाहण्यात माझे अर्धे आयुष्य गेलंय. 
आता तुम्ही ते सगळं आयुष्यभर जपून ठेवा. माझ्या जगण्याच्या संघर्षात आता त्यासाठी वेळ नाही.
#सख्खे_सोयरे_पक्के_वैरी# 

*********************************************************************************
तुम्ही मला सोडून गेल्याच्या दुःखापेक्षा, तुम्ही सगळे एकटे पडल्याचे दुःख अधिक आहे.
तुम्ही रक्ताची नाती तोडलीत, 
मी माणुसकीची नाती गुंफत चाललोय.

*********************************************************************************
पूर्वी भाऊ म्हणजे आधार आणि बहिण म्हणजे प्रेम असे काहीसं ते नाते होते,
आता भाऊ म्हणजे आरोपी आणि बहीण म्हणजे दहशत असे ते झालंय.
#पाशवी_स्त्री-पुरुष_समानता_विजय

****************************************************************************************

पैशांमुळे लोकांना जमिनींचे मोल कळले आणि मला जमिनीमुळे पैशांचे!

*********************************************************************************
मी केलेल्या सर्व्हेमधून जे लोक उधारी, उसनवारी करतात त्यांना स्मृतिभ्रंशाचा विकार जडला असल्याचे दिसून आले आहे!!!

*********************************************************************************
लोकं जर आपली विनाकारण बदनामी करत असतील तर आपणच आपली एवढी बदनामी करायची की,
 त्या लोकांनाच आपल्याबद्दल सहानुभूती वाटायला हवी!!!

*********************************************************************************
ज्याची सावलीच पडत नाही तो कितीही मोठा झाला तरी वांझोटाच ठरणार!!!
#आधारस्तंभाच्या_छत्रछायेत

*********************************************************************************
                                                                                           (संतोबा)संतोष गांजुरे.

मी आणि माझी अहंकारीक वचने - ९

बदल घडत नसतो, तो घडवायला लागतो.
नुसत्या शिळोप्याच्या गप्पा मारून काहीही साध्य होत नाही.

*********************************************************************************
स्वतःला स्वतःची ओळख नसली की जीवन जगणे अवघड होऊन बसते.

*********************************************************************************
भावड्या, समोर खड्डा आहे हे मी तुला सांगून सुद्धा तू तसाच पुढे जाणार असशील तर,
तू त्या खड्डयात पडल्यानंतर मी तुझ्या मदतीला यावे अशी अपेक्षा करू नको.

*********************************************************************************
बदल्याची भावना मनात ठेवून सर्वांगीण बदल(चांगला) घडवता येत नाही.

*********************************************************************************
ज्या कायद्याला तुम्ही वाकवू शकता तोच कायदा एखाद्या दिवशी तुम्हाला सरळ करू शकतो, 
हे कायदा वाकवण्याची भाषा करणाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे.

*********************************************************************************
तुम्हाला दिलेल्या सेवेचा मोबदला तुमच्या खिशात पैसे असताना, 
आदरयुक्त प्रेमाने समोरचा नाकारतो ती तुमची श्रीमंती.
आणि तरीही तुम्ही कोणाचा एक रुपयाही देणे बाकी ठेवत नाही हा तुमचा मोठेपणा.

*********************************************************************************
पुण्याला देशातील जगण्यासाठी सर्वांत चांगले शहर घोषित करण्यापूर्वी केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याच्या जबाबदार अधिकाऱ्याने हडपसर ते हिंजवडी प्रवास करून पहिला असेल का?

*********************************************************************************
उत्पादने देशभक्तीच्या तराजूत मोजण्याऐवजी गुणवत्तेच्या तराजूत मोजली तर.....

*********************************************************************************
तुम्ही प्रशासकीय अधिकारी झालात ! अभिनंदन!!!
आता आपले कर्तव्य नेकीने पार पाडा.
बोल बच्चनगिरीच्या फंदात पडू नका, त्यासाठी स्वयंघोषित तज्ञ आहेत.

*********************************************************************************
एमपीएससी, युपीएससी चा अभ्यासक्रम थोडा सोपा करायला काय हरकत आहे? उमेदीच्या काळातील चारदोन वर्षे अभ्यास करण्यात खर्ची घालवून चमकणारे भावी अधिकारी प्रत्यक्ष कर्तृत्व दाखवायची वेळ येते त्यावेळेस खच खात असतील का? कारण काही सन्माननीय अपवाद वगळता कोणी काही रचनात्मक, सृजनशील, आवाक्याबाहेरचे काम केल्याचे दिसून येत नाही. यांची सारी शक्ती, बुद्धी अभ्यास करण्यात तर खर्च होत नसेल?

*********************************************************************************
                                                                                                (संतोबा)संतोष गांजुरे.

Friday, August 3, 2018

शोधकथा

            फार फार वर्षांपूर्वीची नव्हे तर कालपरवाची कदाचित उद्याचीही गोष्ट असू शकते.सुराष्ट्र नावाचं एक महानगर होतं. महानगराच्या जवळच एक भलामोठा तलाव होता. अनेकवर्षं जेमतेम पर्जन्यमान असल्याने बराचकाळ तलाव कोरडाठाण असायचा. चार दोन वर्षांपासून जोरदार पाऊस होत असल्यामुळे तलाव पूर्ण भरला होता. जोरदार पावसामुळे भरपूर प्रमाणात माती वाहून आल्याने तलावात गाळही बराच गाळ भरला होता. 

       वार्षिक परिक्षा नुकत्याच संपल्यामुळे शाळकरी मुले घरचांच्या विरोधानंतर देखिल लपूनछपून  दुपारी तलावावर पोहायला जाऊ लागली होती. सध्या पाणी फार खोल नसले तरी गाळ खूप होता.  तळ्यात बरोबर मध्यभागी एक फुलांचा ताटवा फुलला होता.दुपारच्या उन्हात तो भलताच आकर्षक वाटत होता. या अशाच फुलांनी काही वर्षांपूर्वी एका शाळकरी मुलाचा बळी गेला होता. त्यामुळे शाळकरी मुलांना तलावावर पोहायला बंदीच घातली होती पण तरीही घरच्यांच्या अपरोक्ष दुपारी मुले पोहायला जाऊ लागली होती. 

         सुरवातीला तलावाच्या कडेला पोहणाऱ्या मुलांना मध्यभागी फुललेली आकर्षक फुले खुणावत होती.मात्र पाणी आटत आल्यामुळे गाळात अडकण्याची भितीसुद्धा होतीच. तरीसुद्धा काही मुलांनी ती फुले आणण्याचे धाडस करण्याचे ठरवले. दुर्दैवाने त्यापैकी एक मुलगा गाळात अडकलाच, बाकीच्या मुलांनी आरडाओरडा करून इतर गावकऱ्यांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. 

                खरंतर मुले त्या फुलांना भुलून भलते धाडस करतील म्हणून गावातील लोक मुलांना पोहायला जाऊ देत नव्हते आणि ही घटना घडली त्यामुळे गावातील जुन्याजाणत्या ग्रामस्थांनी घरोघरी जाऊन मुलांना पोहायला न जाण्याचे आवाहन केले ती फुले ना सुवासिक आहेत ना त्याचा काही उपयोग आहे असेही सांगण्यात आले. कारण परत मुले त्या फुलांकडे जातील याची शंका होती.  मात्र एवढे सांगूनही दुसऱ्यादिवशी त्याच गोष्टीची पुनरावृत्ती झाली. शेवटी त्याच रात्री गावातील जुन्याजाणत्या मंडळींनी बैठक बोलावली व या समस्येवर उपाय म्हणून तो फुलांचा ताटवा उखडून फेकायला ठरवले व दुसऱ्यादिवशी भल्यासकाळी दोघाचौघांनी तो फुलांचा ताटवा उखडून नाहीसा केला.

           दुसऱ्यादिवशी दुपारी जेव्हा ती मुले पोहायला गेली त्यावेळी तो फुलांचा ताटवा गायब होता मात्र त्या फुलांबाबतचे मुलांचे कुतूहल कायम होते. कारण अशी फुले ना त्यांनी शेतात पाहिली होती ना कुठे बाजारात पहिली होती. त्यामुळे त्या मुलांच्या  चौकस बालमनाला त्या फुलांबद्दल जाणून घ्यायची इच्छा होती पण आता त्यासाठी किमान वर्षभर वाट पाहण्याची गरज होती. 
         गावातील कोणीच त्यांना त्या फुलांबद्दल माहिती दिली नाही पण तुम्हाला जर त्या जीवघेण्या फुलांबद्दल काही माहिती असेल तर ती माहिती त्या मुलांना सांगाल का?

Thursday, August 2, 2018

नको नको हो विमानतळ

नको नको हो विमानतळ.
फळां - फुलांचे फुलवू शिवार,
सोबत वाटाणा, भेंडी अन् गवार.
माळव्याचा असे बारामाही बहार,
घाला हो या ब्रह्मराक्षसास आवर.

नको नको हो विमानतळ.
सांगतो पुन्हा एकदा प्रेमाने,
शेतीच करू आम्ही जोमाने.
शेत सिंचतो आम्ही घामाने,
विकणार ना कसल्या दामाने.

नको नको हो विमानतळ.
कसले लागले हे ग्रहण,
गोरगरिबांचे होईल मरण.
काळया आईस ठेऊनी तारण,
कसे सुधारेल हो अर्थकारण.

नको नको हो विमानतळ.
जीव असा कासावीस होई,
प्राण आमुचा कंठाशी येई.
का करिता ही जीवघेणी घाई,
कशी विकावी हो काळी आई.

नको नको हो विमानतळ.
होईल आता लढाई आरपार,
जाईल प्राण पण न घेऊ माघार.
गोरगरिबांचा काळ झालंय सरकार,
त्याचा प्राणपणाने करू हो प्रतिकार.
                                    संतोबा (संतोष गांजुरे).


Thursday, June 21, 2018

मी आणि माझी अहंकारीक वचने --- ७

                 अपप्रवृत्तींना जेवढी मोकळीक द्याल तेवढी त्यांची ताकद वाढत जाते. आज आपण सुपात आहोत म्हणून गहाळ बसलो तर उद्या जात्यात भरडल्याशिवाय राहणार नाही! त्यामुळे अपप्रवृत्तींना वेळच्या वेळी ठेचून काढले पाहिजे नाहीतर त्या एकदा मानगुटीवर बसल्या तर आपली सुटका केवळ अशक्य !

******************************************************************

मानवाची प्रगती!!!
वाघ,सिंह म्हणलं की प्रतिष्ठा,
गाढव,माकड,कुत्रं म्हणलं की अपमान.
पण माणसाला माणूस म्हणून मान्यता आणि प्रतिष्ठा भेटेल काय? 

******************************************************************


श्रेष्ठत्वाचा अतिरेक फार वाईट! आपण वा आपला समूहच फार श्रेष्ठ हा अहंकार आपणांस दुर्मिळ बनवतो आणि दुर्मिळ गोष्टी फार काळ टिकत नाहीत.

******************************************************************

वेळेआधी आणि योग्यतेपेक्षा जास्त मिळाले की तोल ढासळतोच.

*****************************************************************

एकवेळ नितीमान शत्रूपासून बेसावध राहिलं तरी चालेल पण 
हीन मनोवृत्तीच्या लोकांपासून कायम सावध राहिले पाहिजे.

****************************************************************
                                                                                                               (संतोबा)संतोष गांजुरे.

मी आणि माझी अहंकारीक वचने --- ६

           आपणांस ज्या क्षेत्रात कार्य करायचे आहे त्या क्षेत्रातील ज्ञान,कौशल्य आणि अनुभव हा हवाच फक्त इच्छा आणि हौस असून चालत नाही. समजा तुम्हाला शेती करायची आहे अन तुम्हाला गवत आणि गव्हाचे तृण यातील फरक कळत नसेल, कलिंगडाचे मोठं झाड असते की वेल असतो हे माहित नसेल , गाजर जमिनीच्या खाली येतं की वर येते हे साधं माहिती नसेल तर कसं होईल?

या विषयी तुकोबाराय म्हणतात
निवडी वेगळे क्षीर आणि पाणी. 
राजहंस दोन्ही वेगळाली. 
तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. 
येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.

येथे तुकोबारायांना जात अपेक्षित नसून कौशल्य अपेक्षित आहे.

***************************************************************************************************************

           डोळ्यांतील चमक आणि चेहऱ्यावरील तेज, भाव बुद्धिमतेची,संस्काराची आणि नेक कर्तृत्वाच्या दृष्टीची झाक दर्शवत असतात. ती झाक, ते तेज तूप रोटी खाऊन आणि ढोंगबाजी करून कोणा बुजगावण्याच्या चेहऱ्यावर येत नसतेय ते अंगभूत असावे लागतेय.

**************************************************************************************************************


                 अगदी सर्वसामान्य व्यक्तीला मिळालेलं एखादे पद त्या व्यक्तीची समाजातील प्रतिष्ठा, मानमतराब वाढवत असते व काही व्यक्ती इतक्या कर्तृत्ववान असतात की त्यांच्यामुळे त्या पदाची प्रतिष्ठा वाढते व त्या व्यक्तीचे कार्य एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे पुढे त्या पदावर विराजमान होणाऱ्या व्यक्तीला मार्गदर्शक ठरत असते. 
पण एखाद्या व्यक्तीची नियत आणि कुवतच इतक्या खालच्या दर्जाची असते की त्या व्यक्तीची नसलेली आणि पदाची असलेली प्रतिष्ठाही धुळीस मिळते.

*************************************************************************************************************

                                                                                                                      (संतोबा)संतोष गांजुरे.
 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!