ईडा पिडा टळू दे,
विमानतळ जाऊ दे.
बळी चे राज्य येऊ दे.
विमानतळ जाऊ दे.
बळी चे राज्य येऊ दे.
मिटवून वारसा अन् पुसून इतिहास.
कसली प्रगती अन् कसला विकास.
कसली प्रगती अन् कसला विकास.
काळ्या आईशी जोडलिया नाळ,
पैश्यापाण्यानी ती तुटणार नाय.
तुमचं तुम्हाला लाभो विमानतळ.
बळीच्या शिरी नको पुन्हा वामनाचा पाय.
पैश्यापाण्यानी ती तुटणार नाय.
तुमचं तुम्हाला लाभो विमानतळ.
बळीच्या शिरी नको पुन्हा वामनाचा पाय.
ज्याचं जळतयं,
त्यालाच कळतंय.
काळजाच्या तुकड्यावर,
सरकार विमानतळ करतंय.
त्यालाच कळतंय.
काळजाच्या तुकड्यावर,
सरकार विमानतळ करतंय.
एकच आस,एकच ध्यास.
नको प्रगती, नको विकास.
आम्हाला हवा, आमचा श्वास,
आमची माती, आमची माणसं.
नको प्रगती, नको विकास.
आम्हाला हवा, आमचा श्वास,
आमची माती, आमची माणसं.
विमानतळ नको रे, नको रे.
आमच्या गावात आम्हीच होऊ उपरे.
आमच्या गावात आम्हीच होऊ उपरे.
पिकवू आम्ही फुलं अन् फळ.
कशाला हवं विमानतळ.
कशाला हवं विमानतळ.
नाही कळणार आमच्या कळा,
जाणार आमचा प्राणप्रिय मळा.
जाणार आमचा प्राणप्रिय मळा.
हे देऊ,ते देऊ म्हणतील आता.
नंतर करतील नुसती टाळाटाळ.
पोकळ घोषणा अन् पोकळ बाता.
नंतर होईल नुसती पळापळ.
त्यापरी नको ते विमानतळ.
........ संतोबा (संतोष गांजुरे)
नंतर करतील नुसती टाळाटाळ.
पोकळ घोषणा अन् पोकळ बाता.
नंतर होईल नुसती पळापळ.
त्यापरी नको ते विमानतळ.
........ संतोबा (संतोष गांजुरे)
0 प्रतिक्रिया:
Post a Comment