मी माझ्या आईचा एकुलता एक लाडका मुलगा आणि माझ्या
बायकोचा एकमेवाद्वितीय नवरा. अर्थात दोघींचेही माझ्यावर आणि माझेही दोघींवर
जीवापाड प्रेम आहे!
लोकांच्या घरात भांड्याला भांडी लागतात पण आमच्या
घरात शब्दाला शब्द लागणेही कठीण होऊन बसले होते, कदाचित दोघीनांही एकमेकिंबद्दल
काहीतरी तक्रार असावी पण मी नाराज होऊ नये म्हणून त्यांनी असा अबोला धरला
असावा..पण हाच अबोला माझ्यासाठी जीवघेणा ठरत होता.
बायकोवर प्रेम करणे गुन्हा जरी नसला तरी चारचौघात
करणे किवा तसे दाखवणे असेल कदाचित, कारण बरेच जण बायकोवरच्या प्रेमाला किवा तिचे ऐकणार्याला
बायकोचा गुलाम समजतात. आणि ज्यांनी तुम्ही राजा बनण्याची स्वप्ने पाहिलीत त्यांना
असे बायकोचा गुलाम झालेले थोडेच आवडणार आहे आणि आईसाठी मी नेहमीच राजा आहे.
आईबद्दल तर प्रश्नच नाही पण माझी
बायकोदेखिल प्रेमळ आहेच पण मुख्य म्हणजे जास्त समजूतदार आहे. आणि म्हणूनच आम्ही
ठरवले आणि त्याप्रमाणे मी आता बायकोवर चिढतो रागावतो,दम किवा धमकीही देतो अर्थात खोटे तरीसुद्धा ती रडतेच
अगदी खरेखुरे!!!माझ्याकडे फक्त शारीरिकच नाही तर शाब्दिक जीवघेणी ताकद आहे याची
मला आणि बायकोला आता खात्री पटली. आमची ही मात्रा मात्र लागू पडली तेव्हापासून आई
प्रत्येकवेळी सुनेची बाजू घेऊ लागली आहे आणि येणार्या जाणार्या समोर बायकोचे
भरभरून कौतुकही करू लागलीये.
मी लहान असताना आईसुद्धा मी अबोला धरला की माझा
अबोला घालविण्यासाठी ताईवर किवा इतर कोणावरही मुद्दाम खोटेनाटे रागवायची आणि ही
मात्रा माझ्या अबोला घालवण्यास लागू पडायची....मी ही तेच करतोय!!!!!
त्यानंतर आता सासू-सुनेच्या आणि आम्हा
नवरा-बायकोच्या प्रेमाला भलताच बहर आला आहे!!!!!
---संतोष गांजुरे
0 प्रतिक्रिया:
Post a Comment