कधी ती जन्मदाती, कधी भगिनी,
कधी ती जन्मभराची सहचारिणी.
असता ती सहज सोबती, अंगणी,
निघती सारे तिच्या प्रेमात न्हाऊनी.
परी जाणीव ना ती असण्याची मनी.
कष्टाचे तिच्या न होई काही मोल,
घालवती शीण, प्रेमाचे दोन बोल.
तिच्यासाठी ठेव, थोडी प्रेमाची ओल,
उतूमातू नको, नको जाऊ देऊ तोल.
तीजविण सुवर्णक्षणही ठरतील फोल.
तिचं असणं, नसणं न तिच्या हाती,
तरी घरोघरी संसारवेली ती फुलवती.
तिच जपते भाऊबंदकी, नातीगोती.
जगणं तिचं जणू दिव्यातील वाती,
जळूनी सर्वांसाठी उजळवती ज्योती.
नको गाजवू ढोंगी पुरुषी वर्चस्व,
तुझंसाठी तिने अर्पिले सर्वस्व.
तू, तू आणि तू हेच तिचं विश्व.
जिंकण्याची क्षुल्लक ठरतील तत्व,
जर येतील तिच्या डोळ्यांत आसवं.
देह आत्म्याचे मंदिर, ती घराचे सार.
तीजविण घर, जणू आत्म्याविण शरीर.
असूनी सर्वकाही,निस्तेज, निर्विकार.
म्हणे संतोबा, आहे नरदेह नश्वर,
माणूस म्हणोनि जगुनी घे क्षणभर.
.... संतोबा (संतोष गांजुरे)
कधी ती जन्मभराची सहचारिणी.
असता ती सहज सोबती, अंगणी,
निघती सारे तिच्या प्रेमात न्हाऊनी.
परी जाणीव ना ती असण्याची मनी.
कष्टाचे तिच्या न होई काही मोल,
घालवती शीण, प्रेमाचे दोन बोल.
तिच्यासाठी ठेव, थोडी प्रेमाची ओल,
उतूमातू नको, नको जाऊ देऊ तोल.
तीजविण सुवर्णक्षणही ठरतील फोल.
तिचं असणं, नसणं न तिच्या हाती,
तरी घरोघरी संसारवेली ती फुलवती.
तिच जपते भाऊबंदकी, नातीगोती.
जगणं तिचं जणू दिव्यातील वाती,
जळूनी सर्वांसाठी उजळवती ज्योती.
नको गाजवू ढोंगी पुरुषी वर्चस्व,
तुझंसाठी तिने अर्पिले सर्वस्व.
तू, तू आणि तू हेच तिचं विश्व.
जिंकण्याची क्षुल्लक ठरतील तत्व,
जर येतील तिच्या डोळ्यांत आसवं.
देह आत्म्याचे मंदिर, ती घराचे सार.
तीजविण घर, जणू आत्म्याविण शरीर.
असूनी सर्वकाही,निस्तेज, निर्विकार.
म्हणे संतोबा, आहे नरदेह नश्वर,
माणूस म्हणोनि जगुनी घे क्षणभर.
.... संतोबा (संतोष गांजुरे)
0 प्रतिक्रिया:
Post a Comment