काल मला देव भेटला,म्हणजे देव काही माझ्यापासून वेगळा नाहीये पण आजकाल मला माझ्याशीच बोलण्यासाठी वेळ नाही तर काम नसताना देवाशी कशाला बोलू उगाचच. काल देव स्वत:हून माझ्याकडे आलाय हे पाहून विशेष असे काही नाही वाटले. देव कसल्यातरी चिंतेतच होता त्या चिंतेमुळे देवाची तेज:पुंजप्रभा झाकोळली होती. देवालाही स्वत:चे मन मोकळे करावेसे वाटत असेल ना, पण त्यासाठी एवढे देवाचे निस्सीम भक्त असताना माझ्याकडे कशाला हा प्रश्न मला पडला म्हणून त्याला पहिला प्रश्न तोच विचारला तर देव म्हणतो कसा जे आस्तिक आहेत ते त्यांचीच गाऱ्हाणी गाणार,नास्तिक असणाऱ्यांना तर माझा विटाळ होतो म्हणून तुझ्याकडे आलोय.
मी म्हणालो पण देवा मी तर नास्तिक आहे सर्वांना माहित्ये. तू काय माझ्यापेक्षा वेगळा आहेस का? या देवाच्या उत्तराने मात्र मी आश्चर्यचकित झालो, देवाला म्हणालो अरे मी घरातून बाहेर पडताना आई नेहमी म्हणते "देवाच्या पाया पड" तर मी असेच म्हणतो देव काय माझ्यापेक्षा वेगळा आहे का?
पण देवा तू एवढा चिंताक्रांत का आहेस? तुझ्या भक्तांवर एकामागून एक येणार्या संकटांनी तू हैराण झाला आहेस का? तू काहीच करू शकत नाही,का ही तुझीच करणी आहे? लोकांनी तुझ्यावर कसा विश्वास ठेवावा तरीही ठेवतातच कितीही काहीही झाले तरी, पण मग घरादारावर तुळशीपत्र ठेऊन तुझ्या दर्शनासाठी, मोक्ष प्राप्तीसाठी कशाचीही पर्वा न करता कुठे-कुठे यात्रा करतात आणि तू तुला भेटायला आलेल्याच भक्तांना सरळ मुक्तीच देतो आणि तीही इतकी निर्दयीपणे कधी गाड्यांच्या अपघातात तर कधी निसर्गाच्या प्रकोपात. असे का?
देव थोडासा गंभीर होत म्हणाला, जे स्वत:च हरवले आहेत ते मला काय शोधणार ? . ह्याच लोकांनी मला वेगवेगळ्या मंदिरात बंदिस्त केले आहे ना!! अगदी ह्यांच्या सोईनुसार माझ्या विश्रांतीची वेळ ठरते. घुसमट होते रे माझी. मला वाटले मी माणूस बनवून एक अतिशय सुंदर आणि सृजनशील गोष्ट जन्मास घातली आहे. मुलगा तरुण झाल्यावर बापाला आराम मिळेल अशी अपेक्षा असते,त्याप्रमाणे मला ही वाटले आता मलाही विश्रांती मिळेल पण माझा अपेक्षाभंगच झालाय. यांच्या अपेक्षा ऐकून घ्यायलाच मला वेळ मिळत नाही, मग पूर्ण कधी करणार? आणि का म्हणून करायच्या? काय दिले नाही मी? कशात चुकलोय हेच मला कळत नाहिये?मी चराचरात सामावलेला असताना मुळात त्या पवित्र तिर्थक्षेत्राच्या नावाखाली मला एका ठिकाणी बंदिस्त केले आहे. मला शक्य होईल एवढ्या सर्व शक्ती मी मानवाला प्रधान केल्या आहेत.लाख मोलाची बुध्दिमत्ता दिली असताना निर्लज्जपणे कवडीमोल लाचेचे लालूच देऊन मला भ्रष्ट करण्याचा निरर्थक प्रयत्न करत आहेत. वाटले मनुष्य आपल्या बुध्दी सामर्थ्याच्या जोरावर इतर सजीवांना सोबत विश्वाचा रहाटगाडा हाकेल पण त्याला स्वत:लाच न्याय देता आला नाही तर त्या मुक्या जीवांना काय देणार?
देव उद्विग्नपणे असे बरेच काही बोलत होता एकूणच काय देवपणाचे ओझे पेलवणे देवाला जरा
1 प्रतिक्रिया:
Absolutely right! God has become Fear than Friend to us. Article on same topic -- http://www.kattaonline.com/2013/06/god-friend-or-fear.html
Post a Comment