काळी आई मी
लेकरांची,
बळीराजा लेक माझा
गोजिरा.
हिरवे लेणं, साज
माझा साजिरा.
अंगाखांद्यावर
किलबिल पाखरांची,
जणू रुणझूण नववधूच्या पैंजणाची.
काळी आई मी
लेकरांची,
बळीराजा लेक माझा कष्टाळू .
घननिळ आभाळ, बाप
जसा मायाळू.
माणिक मोत्यापरी फळे-फुले बहरती.
विठुमाऊली येती, सावत्याचा मळा पाहती.
विठुमाऊली येती, सावत्याचा मळा पाहती.
काळी आई मी
लेकरांची,
बळीराजा लेक माझा पोशिंदा,
अजाण पांढरपेशी करिती निंदा.
चार पैशात खरेदती बहुमोल वाण ,
कशी होईल त्यांस कष्टाची जाण.
अजाण पांढरपेशी करिती निंदा.
चार पैशात खरेदती बहुमोल वाण ,
कशी होईल त्यांस कष्टाची जाण.
काळी आई मी लेकरांची,
बळीराजा लेक माझा भोळा.
मजवर दलाल ठेविती डोळा,
भूल थापा देऊनी फसवती,
दीड-दमडी साठी सौदा करती.
भूल थापा देऊनी फसवती,
दीड-दमडी साठी सौदा करती.
काळी आई मी लेकरांची,
बळीराजा लेक माझा हतबल.
असहाय्य करुनी नाडती खल.
जाहली कैसी भडव्यांची पैदास,
बळीराजा लेक माझा हतबल.
असहाय्य करुनी नाडती खल.
जाहली कैसी भडव्यांची पैदास,
कुंपणात मज डांबूनी, घालती
हैदोस.
.... संतोबा (संतोष गांजुरे)
.... संतोबा (संतोष गांजुरे)